तलावाची पाळ फुटल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:23+5:30

यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे.

Damage due to lakeside | तलावाची पाळ फुटल्याने नुकसान

तलावाची पाळ फुटल्याने नुकसान

Next
ठळक मुद्देमदतीची मागणी : अनेक एकरवरील धानपीक व मत्स्यबिज गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वैरागड भागासह आरमोरी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने दवंडी गावानजीकच्या तलावाची पाळ फुटल्याने तलावातील पाणीसाठा नष्ट झाला. तसेच तलावामागील धानपीक वाहून गेले. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी दवंडी गावानजीकच्या तलावाचे मातीकाम करण्यात आले. वैरागड येथील मच्छीपालन संस्थांनी लिलाव पद्धतीने मच्छीपालनासाठी महादेव तलाव व आरकबोडीचा तलाव घेतला. मात्र या तलावातील मत्स्यबिज वाहून गेल्याने मच्छीपालन संस्थेचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे वैरागड भागातील नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तलाव, बोड्यांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठी हिवाळ्याच्या अखेरीस व उन्हाळ्यात विविध पीक व पाळीव जनावरांना उपयोगी पडणार आहे. पूरपरिस्थिती पूर्वपदावर आली असल्याने शेतकरी समाधानी आहे.

Web Title: Damage due to lakeside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर