शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता भरूनही मिळाले नाही पीक विम्याचे पैसे ! विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराने शेतकऱ्यांचा हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:17 IST

Chandrapur : खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मार्च २०२६ संपत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची एकही रुपया जमा झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवरविसापूर : खरीप २०२५ हंगामात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मार्च २०२६ संपत असताना शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची एकही रुपया जमा झाला नाही. जानेवारीत रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. पण राज्य शासन व विमा कंपन्यांच्या ढिसाळ कारभाराने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

राज्य शासनाने प्रति हेक्टर १७,५०० रुपयांपर्यंत पीक विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात कागदोपत्री प्रक्रिया रखडली असल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजी आहे. शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाइन आणि बैंक शाखांमार्फत प्रीमियम भरला. मात्र नुकसान मूल्यांकन अहवाल व विमा क्लेम प्रक्रियेत विलंब झाल्याने पैसे अडकले आहेत.

२०२४ मध्ये सरकारने एक रुपया योजनेतून विमा भरून दिला होता. यंदा पैसे भरूनही काय फायदा, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. अतिवृष्टीत सोयाबीनाचे पिक उद्ध्वस्त झाले, कर्ज फेडायला पैसा नाही, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पीक कापणी प्रयोग अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला.

"बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन व कापूस पिकाचे एकूण २४ पीक कापणी प्रयोग होते. सर्व अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर झाले. त्या आधारावर पीक विम्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे."- आकाश पवार, तालुका कृषी अधिकारी बल्लारपूर

"२०२४ मध्ये एक रुपयात विमा मिळाला म्हणून विश्वास ठेवला. २०२५ मध्ये पैसे भरूनही काहीच नाही. सोयाबीन खराब झाले.. कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न आहे."- प्रशांत अटकारे, शेतकरी हडस्ती

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Await Crop Insurance Despite Paying Premiums; Disappointment Ensues

Web Summary : Visapur farmers face disappointment as crop insurance payments are delayed despite premium payments due to heavy rainfall in 2025. The government's promise of ₹17,500 per hectare remains unfulfilled, leaving farmers burdened with debt and questioning the scheme's benefits.
टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीfarmingशेती