बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
By राजेश भोजेकर | Updated: August 28, 2025 12:59 IST2025-08-28T12:58:36+5:302025-08-28T12:59:42+5:30
वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं

बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत (बफर) खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधील गंभीर जखमी अवस्थेतील 'छोटा मटका' अर्थात 'सीएम' (टी-१२६) वाघाला बचाव मोहिमेंतर्गत बुधवारी रात्रीच्या सुमारास यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती आहे. वनविभागाने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर' (टीटीसी), चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
ही मोहीम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ल व उपसंचालक (बफर) आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शीघ्र कृती दलाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आली. या बचाव मोहिमेदरम्यान वाघास कमीतकमी इजा होईल, याची विशेष काळजी घेण्यात आली.
१२ मे २०२५ ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी, बफर परिक्षेत्रांतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र.६३ मधील उमरीखोरा परिक्षेत्रात 'टी-१२६' व 'टी-१५८' या दोन वाघांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत 'टी-१५८' वाघाचा मृत्यू झाला, तर 'टी-१२६' गंभीर जखमी झाला होता. 'एनटीसीए'च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीन्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी जखमी 'टी-१२६' वाघ मानव-वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरून अनुचित मनुष्यहानी होऊ नये, याकरिता त्यास जेरबंद करण्याचे आदेश २७ ऑगस्टला पारित केले होते. वाघाला जेरबंद करून 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'मध्ये उपचारार्थ हलवण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यानुसार ही मोहीम बुधवारी राबवण्यात आली. रात्री ८:३० वाजताच्या सुमारास छोटा मटका जेरबंद झाल्याची माहिती ताडोबातील सूत्रांनी 'लोकमत'ला दिली. वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर' (टीटीसी), चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
ही मोहीम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ल व उपसंचालक (बफर) आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनात शीघ्र कृती दलाचे सहाय्यक वनसंरक्षक अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आली. या बचाव मोहिमेदरम्यान वाघास कमीतकमी इजा होईल, याची विशेष काळजी घेण्यात आली.
१२ मे २०२५ ला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी, बफर परिक्षेत्रांतर्गत निमढेला नियतक्षेत्राच्या कक्ष क्र.६३ मधील उमरीखोरा परिक्षेत्रात 'टी-१२६' व 'टी-१५८' या दोन वाघांमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. या झुंजीत 'टी-१५८' वाघाचा मृत्यू झाला, तर 'टी-१२६' गंभीर जखमी झाला होता. 'एनटीसीए'च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीन्वये प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी जखमी 'टी-१२६' वाघ मानव-वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरून अनुचित मनुष्यहानी होऊ नये, याकरिता त्यास जेरबंद करण्याचे आदेश २७ ऑगस्टला पारित केले होते. वाघाला जेरबंद करून 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'मध्ये उपचारार्थ हलवण्याची सूचनाही करण्यात आली होती. त्यानुसार ही मोहीम राबवण्यात आली.