भोजवॉर्डातील अंगणवाडीची इमारत जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:00 AM2020-03-05T05:00:00+5:302020-03-05T05:00:33+5:30

सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारतीच्या परिसरात लहान बालके खेळतात. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

The courtyard of the banquet in the banquet is torn down | भोजवॉर्डातील अंगणवाडीची इमारत जीर्ण

भोजवॉर्डातील अंगणवाडीची इमारत जीर्ण

Next
ठळक मुद्देअपघाताची शक्यता : नव्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : शहरातील भोजवार्ड येथे असलेल्या अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून धोका लक्षात घेता गेल्या पाच वर्षांपासून येथील अंगणवाडी बारईसमाजाच्या समाज भवनात सुरू आहे. जीर्ण असलेल्या या इमारतीला पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधावी, अशी मागणी नगरसेविका शितल गेडाम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर इमारतीची माहिती पालिका कार्यालयाला देण्यात आली मात्र पालिकेने अटी व शर्ती लावून सदर इमारतीला पाडून नवीन इमारत बांधण्याची परवानगी दिली नसल्याचा आरोप केला आहे.
सदर इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आहे. या इमारतीचा संभाव्य धोका ओळखून या इमारतीतील अंगणवाडी बारई समाजाच्या समाजभवनात सुरू आहे. यामुळे येथीलन अंगणवाडीतील बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक इमारतीच्या परिसरात लहान बालके खेळतात. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सदर अंगणवाडी इमारतीचे कागदपत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. मोका चौकशीनुसार सदर इमारत अगदीच जीर्ण अवस्थेत आहे. पालिकेने दिलेल्या अटी व शर्ती पाळून ही इमारत पाडण्यास व नवीन बांधकाम करण्यास प्रकल्प अधिकाºयाला परवानगी देण्यात दिली.
- गिरीष बन्नोरे, मुख्याधिकारी,
न.प. भद्रावती

Web Title: The courtyard of the banquet in the banquet is torn down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.