कोरपना : अनेक वर्षापासून कोरपना चौकात आॅटो, सुमो, कमांडर अशी अनेक खासगी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी ठेवून प्रवासी भरले जात होते. मात्र लोकमतने १७ नोव्हेंबरच्या अंकात यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच, पोलीस प्रशासनाला जाग आली. बेला-वणी-गडचांदूर या मार्गावर चालणाऱ्या चारचाकी वाहनाला कोरपना पोलीस विभागाने शिस्त लावून वाहनधारकांना शासनाच्या नियमाचे पालन करण्याच्या सूचना केल्या. आदिलाबाद-वणी या महामार्गावरुन येणाऱ्या गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अवैध दारू येत होती मात्र या कारवाईमुळे अवैध दारूला आळा बसला असून दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कोरपना वाहतूक विभागाने जातीने लक्ष घालून तातडीने कारवाई सुरू केली. चारही मार्गावरील वाहन धारकांना शिस्त लावून दिली. पोलिसांनी यापुढेही लक्ष देऊन कायमस्वरुपी शिस्त ठेवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.मंगळवारी केलेल्या कारवाईने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले तरी केली कारवाई पुढेही सुरूच राहील काय, असा नागरिकांचा प्रश्न आहे. येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाकरिता मोठ्या संख्येने येतात. शिस्तीमुळे निश्चितपणे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. सामान्य नागरिकांना वाहनाचा त्रास होणार नाही. चौकातील व्यापारी वर्गाला या वाहनाचा नाहक त्रास होतो. वाहनांना शिस्त लावल्याने दुकानासमोर वाहने उभी करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
कोरपना पोलिसांनी वाहनधारकांना लावली शिस्त
By admin | Updated: November 18, 2015 01:08 IST
अनेक वर्षापासून कोरपना चौकात आॅटो, सुमो, कमांडर अशी अनेक खासगी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच उभी ठेवून प्रवासी भरले जात होते.
कोरपना पोलिसांनी वाहनधारकांना लावली शिस्त
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}