शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाग्रस्त तेलंगणातून मजुरांचे लोंढे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथेच अडकून आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे ढिसाळ नियोजन । वैद्यकीय तपासणी न करताच रेड झोनमधून ग्रिन झोनमध्ये

वेदांत मेहरकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो मजुरांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेलंगणा राज्य सीमेच्या शिरपूर गावात प्रवेश करून तेथून महाराष्ट्र राज्यात परतीची वाट धरली आहे. कोरोनाबाधित (रेड झोन) जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आलेल्या या मजुरांची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता थेट महाराष्ट्रात एन्ट्री झाल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, डोळ्यात तेल ओतून काम करण्याचा डंगा मिरविणारे प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. यामुळे रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात गेलेल्या हजारो मजुरांना तेथेच अडकून रहावे लागले. हाती काम नाही. जवळ पैसा नाही. तेलंगणा प्रशासनाकडून मिळणारी मदतही तोकडी. अशा कठीण परिस्थितीत हे मजूर अडकून पडले. कोरोनासोबतच उपासमारीच्या संकटाला कंटाळून अखेर त्या मजुरांनी परतीची वाट धरली. बहुतांश मजुरांनी शेकडो किलोमीटरचे अंतर पायदळ प्रवासातून पार केले. तर काही मजूर अद्यापही तेथेच अडकून आहेत.दरम्यान, शनिवारी सायंकाळी तेलंगणा प्रशासनाने तसेच तेथील काही कंत्राटदारांनी कामावर असलेल्या मजुरांना मोठया वाहनांनी सीमावर्ती भागात पोहोचविले. परंतु याची कुठलीही पूर्वसूचना येथील प्रशासनाला मिळाली नाही. सायंकाळच्या सुमारास हजारोंच्या संख्येने मजुरांचा लोंढा महाराष्ट्रात दाखल झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. येथे आलेले बहुतांश मजूर हे कोरोनाबाधित रेड झोन जिल्ह्यातून आल्याचे कळते. विशेष म्हणजे, हजारोंच्या संख्येने आलेल्या मजुरांची कुठलीही आरोग्य तपासणी करण्यात आली नसल्याचीही माहिती आहे.तेलंगणातून हजारोंच्या संख्येत आलेल्या मजुरांपैकी बहुतांश मजूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांची तालुका प्रशासनामार्फत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली आहे. उर्वरित इतर जिल्ह्यातील मजुरांनादेखील त्यांच्या मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्था वरिष्ठ स्तरावर विचाराधीन आहे.-प्रदीपकुमार राठोड, पोलीस निरीक्षक, गोंडपिपरी.विशेष बसेसची व्यवस्थाटाळेबंदीमुळे तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात अडकलेले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील मजूर त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून बसेसची व्यवस्था केली आहे. या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. या मजुरांची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून त्यांना आणण्यात येत आहे. हे सर्व मजूर गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. हे सर्व मजूर अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून त्यांच्या शेतातील कामे खोळंबली जाणार आहे. या मजुरांचे वृद्ध आईवडील, मुले हे त्यांच्या स्वगावी असल्याने दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीमुळे मजुरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या मजुरांना तत्काळ स्वगावी आणण्यासाठी शासनस्तरावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी विनंतीपर मागणी पालकमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली व सतत पाठपुरावा केला.तेलंगणा राज्यातून आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी सीमावर्ती भागातील पोळसा पुलानजिक वैद्यकीय चमूकडून सुरूच आहे. आरोग्य विभाग याकडे गांभीयार्ने लक्ष देत आहे.-डॉ. दिनेश चकोले, तालुका आरोग्य अधिकारी, गोंडपिपरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या