लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता. तसेच न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाकडे त्यांचा पूर्व इतिहास अद्याप नाही. त्याचा थ्रोट स्वॅब नागपूरला पाठवला होता. त्याचा शनिवारी निकाल पॉझिटिव्ह आला आहे.
आतापर्यंत ऑरेंज झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 21:04 IST