या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:00 AM2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:54+5:30

सर्व स्तरावरील शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरावी. एमबीबीएस डाॅक्टरांकडून मानसेवी पद्धतीने सेवा घ्यावी. इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रभावी पाठपुरावा व नियोजन हवे. आरटीपीसीआर रिपोर्ट २४ तासांत मिळावा. गरिबांची गैरसोय होऊ नये. रुग्णांमधील समज-गैरसमज दूर करण्यासाठी जागृती व जाहिराती कराव्यात, असेही सुचविले आहे. 

Corinne can rule through this triad with both hands in crisis | या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात

या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात आता कोरोनाची तिसरी लाट दाखल झालेली आहे. दुसऱ्या लाटेची भीषणता चंद्रपूरकरांनी चांगलीच अनुभवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आतापासूनच सर्व खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करून लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून ४० महत्त्वपूर्ण उपाय सुचिवले आहेत. सोबतच चंद्रपूरसह राज्यातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी चाचणी, जनजागरण आणि लसीकरण या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, याकडे लक्ष वेधले आहे.
रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य नियोजनातून सर्व सभागृह, हाॅटेल्स, समाज मंदिरांची यादी करून आताच दुरुस्ती करावी. बेडच्या सहज उपलब्धतेसाठी टोल फ्री नंबर असावा. आयसीयूच्या स्थितीसाठी बेड माॅनिटरिंग सिस्टीम साॅफ्टवेअरची गरज आ. मुनगंटीवार यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
सर्व स्तरावरील शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरावी. एमबीबीएस डाॅक्टरांकडून मानसेवी पद्धतीने सेवा घ्यावी. इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रभावी पाठपुरावा व नियोजन हवे. आरटीपीसीआर रिपोर्ट २४ तासांत मिळावा. गरिबांची गैरसोय होऊ नये. रुग्णांमधील समज-गैरसमज दूर करण्यासाठी जागृती व जाहिराती कराव्यात, असेही सुचविले आहे. 
आशा वर्कर व ग्रामपंचायतींकडे एक ऑक्सिमीटर, थर्मामीटर व जनजागरण फलक द्यावा. ग्रामपंचायतींना लोकसंख्येनुसार तातडीने निधी द्यावा. रुग्णवाहिकांची संख्या वाढून कंत्राटी डाॅक्टर नियुक्त करावे. क्वारंटाईन असणाऱ्यांसाठी एक ई-बुक, डिजिटल बुक तयार करावे. प्रत्येक तालुक्यात वेगळी दहनभूमी तयार करावी. कोरोना संकटात अन्य गंभीर आजाराच्या रुग्णांची काळजी घ्यावी, याकेही लक्ष वेधले. औषधांअभावी रुग्णाचा जीव जाऊ नये.  (नस्तीचा निपटारा तातडीने व्हावा/३)

दुसऱ्या लाटेतही दिले होते ४२ मुद्दे
कोरोनाची दुसरी लाट भयावह होती. यावेळीही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना उपाययोजनांबाबत ४२ मुद्दे सुचविले होते. आरोग्य मंत्र्यांनी विरोधी पक्षातील आमदाराने दिलेल्या मुद्यांबाबत कौतुक केले होते. 

 

Web Title: Corinne can rule through this triad with both hands in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.