शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेजसाठी हालचाली सुरू

By admin | Updated: June 4, 2014 23:36 IST

चंद्रपूर शहरात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती या पार्श्‍वभूमीवर बुधवारी

वैद्यकीय सेवेची केली पाहणी : दिल्लीतील समिती चंद्रपुरात दाखलचंद्रपूर : चंद्रपूर शहरात होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींनी आता वेग घेतला आहे. दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती या पार्श्‍वभूमीवर बुधवारी चंद्रपुरात दाखल झाली. या समितीने आज दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची बारकाईने पाहणी केली.चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. उद्योग असल्यामुळे अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याशिवाय प्रदूषित शहर म्हणूनही चंद्रपूरची ओळख झाली आहे. त्यामुळे विविध आजाराने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. एखाद्यावेळी रस्ता अपघात किंवा उद्योगात अपघात झाल्यास त्याला नागपूर येथे न्यावे लागते. अशावेळी वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा वाटेतच जीव जातो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर शासनाने चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली.  त्यानंतर जागेसाठी प्रस्ताव अडला होता. अखेर बायपास मार्गावरील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्‍चित करण्यात आली. आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी दिल्लीतील मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाची एक त्रिसदस्यीय समिती आज चंद्रपुरात दाखल झाली. या समितीत मौलाना आझाद मेडीकल कॉलेज आग्राचे डॉ. अग्रवाल, जबलपूर मेडीकल कॉलेजचे मेडीसीन विभागाचे एचओडी डॉ. पाराशर व दिल्ली मेडीकल कॉलेजचे डॉ. बालकृष्णन यांचा समावेश आहे.या समितीने आज दुपारी १ वाजताच्या सुमारास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद सोनुने, डॉ. अनंत हजारे, इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते. समितीने रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, गायनोकोलॉजी विभाग, अपघात विभाग, मेडीसीन विभाग, शवविच्छेदन विभाग, प्रसुति विभाग यासह सर्व विभागाला भेटी दिल्या. तिथे कर्मचारी संख्या व यंत्रसामुग्रीची पाहणी केली. याशिवाय इतर कुठल्या सुविधा नाहीत, याचीही नोंद केली. जिल्हा सामान्य रुग्णालय हे ३00 खाटांचे आहे. मात्र आज या ठिकाणी ४५0 रुग्ण दाखल असल्याचेही समिती सदस्यांना आढळले. त्यानंतर समितीने ब्लड बँक, टेलीमेडीसीन सेंटरचीही पाहणी केली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुविधांची तरतूद व सध्या उपलब्ध सुविधा याची तुलनाही या समितीने केली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही समिती टीबी हॉस्पीटलकडे रवाना झाली. तिथे १00 खाटांचे रुग्णालय आहे, त्याचीही पाहणी केली. यादरम्यान ही जागा वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध करून दिल्यास वैद्यकीय महाविद्यालय तातडीने सुरू होण्यास मदत होईल, असे डॉ. गुलवाडे यांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर समितीतील डॉ. अग्रवाल, डॉ. पाराशर व डॉ. बालकृष्णन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. तिथे प्रदूषण, लोकसंख्या आदीसह काही समस्या जाणून घेतल्या. (शहर प्रतिनिधी)