तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव ते अडेगाव या रस्त्याचे बांधकाम मागील दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. असे असतानाच संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे बांधकाम अर्धवट केले व त्यानंतर रस्त्यावर गिट्टी टाकून ठेवली. त्यावर अजूनपर्यंत डांबरीकरण झाले नसल्याने गावकऱ्यांना या मार्गावरून जाता-येताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मागील दोन महिन्यांपासून या रस्त्याचे बांधकाम अर्धवट करून ठेवले असल्याने सदर मार्गावर गिट्टी टाकून असल्याने वाहतुकीस अडथळा येत असून गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
सदर कामाबाबत विचारपूस करण्याकरिता अडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.