शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांची शेतकरी संघटनेला साथ

By admin | Updated: June 4, 2015 01:15 IST

पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी...

चंद्रपूर : पक्षाने मोठे पद दिले असले तरी स्वत:च्या राजकीय महत्वाकांक्षेपायी सतत पक्षविरोधात वागणाऱ्या आबीद अली यांनी वनसडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील निवडणुकीत उचललेले पाऊल राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेचे ठरले आहे.वनसडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (र.न.९०३) येथील संचालक मंडळाची निवडणूक ७ जूनला होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात शेतकरी संघटना माघारली. संघटनेचे स्थानिक कार्यकर्तेही पुन्हा लढण्याच्या मानसिकतेत नसताना आबीद अली यांनी पुढाकार घेवून शेतकरी संघटनेचे सहा उमेदवार रिंंगणात उभे केले. त्यांच्यासोबत काँग्रेसधील सात कार्यकर्तेही मैदानात उतरविले. असा स्वत:सह १३ उमेदवारांचा गट उभा केला. पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांना विचारात न घेता शेतकरी संघटनेच्या आधाराने उभे केलेल्या पॅनलची बैठक घेवून त्यांनी स्वत:सह सर्वांचे नामनिर्देशनही दाखल केले.स्वत: काँग्रेस पक्षाचे कोरपना तालुकाध्यक्ष आणि काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांनी पक्षातील कुण्याही जबाबदार पदाधिकाऱ्यांना अथवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हे पाऊल उचलले. त्यांची ही कृती न रूचल्याने जिल्हौ मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रईधरराव गोडे यांच्यापुढाकारात काँगे्रस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्षांच्याच विरोधात पॅनल उभारण्याची तयारी दर्शविली. या बैठकीत आबीद अली यांनी संघटनेला पाच जागा, काँग्रेसला पाच आणि स्वत:च्या उमेदवारांना तीन जागा दिल्यास तडजोड करू आणि अविरोध निवडणूक करू असा प्रस्ताव दिला. मात्र तो कार्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याने अखेर काँग्रेस तालुकाध्यक्ष असलेल्या आबीद अली यांच्या विरोधातच दुसरे पॅनल उभे झाले आहे.दरम्यान, आपल्या विरोधात पक्षातील सर्वजण एकवटल्याने आबीद अली यांनी अखेरच्या क्षणी स्वत:चे नामांकन परत घेतले. मात्र काँग्रेसच्या गटाला त्याची साथ मिळण्याची प्रतीक्षा कायमच आहे. काँगे्रसच्या गटातील तीन सदस्य अविरोध आले असून १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आबीद अली कोणत्या गटासोबत राहतात, याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)