शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना चंद्रपूरचे निमंत्रण

By admin | Updated: October 5, 2016 00:58 IST

स्थानिक गांधी चौक येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत असून...

संयुक्त बैठक : मुंबई येथे अहवाल सादरचंद्रपूर : स्थानिक गांधी चौक येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येत असून त्याकरिता प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना प्रस्तावित ८ आॅक्टोबर रोजीच्या मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले.प्रदेश काँग्रेसतर्फे दादर येथील टिळक भवन येथे महाराष्ट्रातील सर्व विभागीय काँग्रेस उमेदवार, आमदार, निरीक्षक, प्रभारी, समन्वयक व ग्रामीण-जिल्हा-शहर अध्यक्षांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी आपला अहवाल सादर करून चंद्रपूर शहराची परिस्थिती मांडली आणि त्यांना सर्व बाबींचा खुलासा करून निदर्शनास आणून दिले.जिल्ह्याचे निरीक्षक एस. क्यू. जमा व प्रमोद तितरमारे यांना निर्देश दिले की, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष फक्त नंदू नागरकर अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमेटीची मान्यता असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊनच स्थानिक नेत्यासोबत समन्वय साधून पुढील पक्ष कार्यकर्ता मेळावे, बुथ कमेटी व संघटन बांधणी आणि सर्व मनपा नगरसेवक व पदाधिकारी यांनी पक्षाचे ध्येय धोरणाप्रमाणे आणि वेळेवर सुचविलेल्या निर्देशाप्रमाणे पक्षाचे कार्य करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर मनपाद्वारे झालेल्या घर टॅक्स वाढीचा व भ्रष्टाचाराने फोफवलेल्या विषयावर चर्चा झाली. काँग्रेस कमेटीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करून भारतीय जनता पार्टीला नामोहरण केले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीला जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, यावर काम करावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात ८ आॅक्टोबर रोजी प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण येत आहेत. त्यासाठी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा स्थानिक गांधी चौक येथे घेण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.या विभागीय बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार-उपगटनेता विजय वडेट्टीवार, प्रदेश महासचिव गणेश पाटील, एस.क्यु. झामा माजी आमदार तथा निरीक्षक, निरीक्षक प्रमोद तितरमारे, प्रदेश सचिव डॉ. आसावरी देवतळे, विनोद दत्तात्रय आणि नागपूर विभागाचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)