शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

दूध वाढीसाठी ठोस उपाययोजना

By admin | Updated: June 14, 2017 00:25 IST

महाराष्ट्र दूध उत्पादनात राज्य मागे होते. त्यामुळे आपल्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते.

महादेव जानकर : पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र दूध उत्पादनात राज्य मागे होते. त्यामुळे आपल्याला अन्य राज्यांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र ही स्थिती लवकरच पालटणार असून दूध उत्पादनात देशात अग्रेसर होण्याकरिता मंत्री म्हणून काही ठोस पावले उचलण्यात आली आहे. यामाध्यमातून राज्यात दूधाची क्रांती होईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ना. जानकर यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, आपल्याला पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविवकास मंत्रिपदाची जबाबदारी येताच शपथ घेतल्यानंतर आवश्यक गोष्टींचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता विशाखापट्टणम, गोवा, ओडिशा, दिल्ली येथे गेलो. आपल्या खात्यांतर्गत जगाची, देशाची तसेच राज्याची स्थिती काय, याचा अभ्यास केला. यात सर्व बाजूंनी राज्य पिछाडीवर असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले. तेव्हापासून या क्षेत्रात राज्याला अव्वल करण्यासाठीचे ठोस प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील दुधाच्या कंपन्यांना वाव मिळावा, या उद्देशाने अमूलसारख्या कंपनीला राज्यात प्रकल्प तयार करण्यास नकार दिला. आज आरे (भूषण) या कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दूध तयार होत आहे. पुढे ही प्रगती आणखी व्यापक होईल. त्यांनी सांगितले की, दुग्धविकासाप्रमाणेच पशुसंवर्धन तसेच मत्स्यविकासाबाबतची स्थिती होती. मत्स्यबीज हे पश्चिम बंगाल तर अंडी आणि कोंबडी तेलंगणासारख्या राज्यातून आयात करावी लागत होती. आता हे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. भविष्यात महाराष्ट्र संपूर्णत: आत्मनिर्भर बनणार आहे. टाटा समूहाच्या माध्यमातून जगातील एकमेव अ‍ॅनिमल केअर हॉस्पीटल तयार होणार असून याच्या जागेकरिता तीन दिवसापूर्वीच मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.