शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर मतदार संघातील मुख्य रस्ते तीन वर्षांत पूर्ण करा

By admin | Updated: June 24, 2015 01:37 IST

बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मुख्य रस्ते तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील सर्व मुख्य रस्ते तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. या क्षेत्रातील रस्ते आमदार निधी, मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना, २५/१५ व जिल्हा नियोजनमधून तसेच राज्य निधी मधून करण्यात यावेत. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, मात्र गुणवत्ता व दर्जा याबाबत कुठलीही तडजोड होता काम नये, तसेच बाबूपेठ उड्डाण पुलाचा पाठपुरावा वेगाने करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बल्लारपूर मतदार संघातील कामांबाबतचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अधीक्षक अभियंता डी. के. बालपांडे, कार्यकारी अभियंता अनिल गाडेगोणे, एम.एम. जयस्वाल, सभापती देवराव भोंगळे व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते.बल्लारपूर नाट्यगृह, मूल नाट्यगृह, बल्लारपूर व दुर्गापूर पोलीस स्टेशन अद्ययावत करणे, मूल प्रशासकीय इमारत, मूल पंचायत समिती इमारत, खनिज निधीमधून चार कोटीचा अजयपूर रस्ता, चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राची संरक्षण भिंत, रेंजर कॉलेज अकादमी, खनिज विकास निधीमधून घुग्घुस, दुर्गापूर येथे रस्ते प्रस्तावित करणे, बल्लारपूर न्यायालय इमारत, मूल ग्रामीण रुग्णालय अद्ययावत करणे, पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करणे, मूल येथे श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे बांधकाम, प्रिदर्शनी इंदिरा गांधी सभागृह वातानुकूलित करणे, बल्लारशा ते बामणी विजेची व्यवस्था करणे, पोंभुर्णा शहरातील मुख्य रस्ता सिमेंटचा करणे, पळसगाव व घाटकुळे पुलाचे बांधकाम, ताडोबाला जाणारा प्रत्येक रस्ता तयार करणे, मेडिकल कॉलेजचा आराखडा तयार करणे, दाताळा पुलाचे डिझाईन उत्तम दर्जाचे करणे, मूल व बल्लारशा बायपास तसेच जुनोना रस्ता तयार करणे, चंद्रपूर बायपास रस्ता करण्यासाठी पर्याय तपासणे, चंद्रपूर न्यायालय इमारत नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करणे, हुतात्मा स्मारक सौंदर्यीकरण, स्व.बाबा आमटे अभ्यासिका वेगाने पूर्ण करणे, बल्लारशा, मूल, पोंभुर्णा क्रीडा संकुलाचे बांधकाम व चंद्रपूर संकुलाचे अद्ययावतीकरण तातडीने करणे व बाबूपेठ उड्डाण पुलाचा पाठपुरावा करणे इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्याने करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.या कामांपैकी काही कामासाठी या अगोदर निधी मंजूर करण्यात आला असून वाढीव निधीची आवश्यकता असल्यास तत्काळ प्रस्ताव सादर करावा. बाबूपेठ उड्डान पुल व वनस्पती उद्यानाची संरक्षण भिंत यासह सर्वच कामे कालबद्ध वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. (स्थानिक प्रतिनिधी)कामात हयगय करणाऱ्यांची खैर नाहीबल्लारपूर मतदार संघातील सर्व रस्त्यांची लांबी निश्चित करून तसा अहवाल देण्यात यावा, रस्त्याची कामे करताना रस्त्याच्या दुर्तफा वृक्षारोपण, साईन ईमेज, रिफ्लेक्टर बसविणे आवश्यक आहे. ही सर्व कामे तातडीने करण्यात यावे आणि कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत केल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.