शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

‘हॅलो चांदा’वर तक्रारींचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:10 IST

राज्यात केवळ चंद्रपूरमध्ये सुरु झालेल्या ‘हॅलो चांदा’ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेवर दूरध्वनी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शेकडो तक्रारी : १६ निकाली, अडीचशेवर तक्रारी प्रक्रियेतलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात केवळ चंद्रपूरमध्ये सुरु झालेल्या ‘हॅलो चांदा’ पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेवर दूरध्वनी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणावरुन दूरध्वनी व्यस्त असल्यामुळे तक्रार दाखल न करता आल्याची नागरिकांची तक्रार आहे. तथापी एकाचवेळी अनेक फोन येत असल्यामुळे व्यस्तता येत असून नागरिकांनी ही तांत्रिक बाब समजून या यंत्रणेचा फायदा घेणे सुरु ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.१५ जुलैपासून सुरु झालेल्या पालकमंत्री तक्रार निवारण केंद्रावर दीड हजारावर नागरिकांनी मोबाईलवर तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत शेकडो तक्रारींची नोंदणी झाली असून यावर जिल्हा प्रशासन संबंधित विभागाकडून जाब मागत आहे. एक महिन्याच्या आत तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असून आतापर्यंत तात्काळ निकाल देता येण्यासारख्या १६ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडीशेच्यावर तक्रारी प्रक्रियेत असून संबंधित विभागांना याबाबत अवगत करण्यात आले आहे. कोणत्याही कार्यालयात न जाता आपली तक्रार जिल्हा प्रशासन एका फोनवर विनम्रपणे ऐकूण घेते. त्याची सोडवणूक करते. याबाबत जिल्हयातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असून शासन थेट एका फोन कॉलवर आपल्या सेवेत आल्याबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे. दरम्यान काही असामाजिक घटकांकडून फोन स्विकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास देणारे फोन कॉल्स जिल्हा प्रशासनाने नोंदवून घेतले आहे. संबंधितांचे नंबर यंत्रणेमध्ये उमटत असून या संदर्भात पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या फोन कॉलचा दूरउपयोग करु नये, मोजक्या शब्दात व कमी वेळात आपली तक्रार मांडावी, अनेकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.ही यंत्रणा सुरु केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या पहिल्याच दौऱ्यात वरोरा, भद्रावती या तालुक्यातील कार्यक्रमांमध्ये जनतेने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत केले. ग्रामीण भागातील जनतेला या यंत्रणेमुळे थेट प्रशासनाशी संर्पक साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त होत आहे. याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा.