शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलितून जातो बंद उद्योगांनाही कोळसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी । तक्रारकर्त्यालाच जिवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वेकोलितून बंद असलेल्या लघू उद्योगांनाही कोळसा पुरवठा होत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या दीपक दीक्षित यांना एका व्हॉटस्अ‍ॅप कॉलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी १९ मार्च रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दीक्षित यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा होत असल्याची बाब नमुद केली आहे.फ्युल सप्लाय करारनामा (एफएसए) नुसार वकोलि महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने दिलेल्या उद्योगांच्या यादीनुसार राज्यातील सुमारे ४०० लघू उद्योगांना दर महिन्याला ६० हजार मेट्रीक टन कोळशाची आवश्यकता आहे. यामध्ये काही उद्योग बंद तर काही बोगस उद्यांगांचाही समावेश आहे. मंदी व इतर कारणास्तव महाराष्ट्रातील ३० टक्के उद्योगच व्यवस्थित सुरू असून ७० टक्के उद्योग बंद आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ व वेकोलि अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुमारे ४२ हजार मे. टन कोळसा काळ्या बाजारात जात आहे. अधिकारी, दलाल व कोल माफिया हा कोळसा ७ हजार रुपये मे.टन ने खुल्या बाजारात विकत असून याची अंदाजे किमत ३१ कोटींच्या घरात आहे. ज्यामधून १० कोटी वजा जाता प्रत्येक महिन्याला २१ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेकोलि अधिकारी, दलाल व कोल माफिया कमवत आहे. अशी तक्रार करून प्रकरणाची एसआयटी गठित करून वा केंद्र सरकारच्या अधिनस्त सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी दीपक भारतसिंह दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे कोळसा माफियांचे धाबे दणाणले आहे. परिणामी तक्रारकर्ते दीपक दीक्षित यांनी शहजाद नावाने असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान कॉल करणाऱ्या इसमाने महाराष्ट्र मायनिंग कार्पोरेशनच्या कोळसा घोटाळासंबंधी तुने तक्रार केल्यामुळे डब्लूसीएलने कोळसा देणे बंद केले आहे. त्यामुळे आम्हा चौघांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले असून आमचे कोळशाचे काम बंद झाले आहे. यावेळी अश्लाघ्य शब्दांचा वापर करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दीपक दीक्षित यांनी १९ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.