स्वच्छतेसाठी लावले सूचनेचे फलक

By Admin | Updated: May 7, 2014 14:18 IST2014-05-07T14:18:29+5:302014-05-07T14:18:29+5:30

स्थानिक प्रशासनाने गावाच्या स्वच्छतेसाठी कितीही खर्च केला तरी पण सार्वजनिक स्वच्छतेसाठी गावातील लोकांचे सहकार्य असेल तरच गावात स्वच्छता राहू शकते.

Clean up panel for cleanliness | स्वच्छतेसाठी लावले सूचनेचे फलक

स्वच्छतेसाठी लावले सूचनेचे फलक

वैरागड : स्थानिक प्रशासनाने गावाच्या स्वच्छतेसाठी कितीही खर्च केला तरी पण सार्वजनिक स्वच्छतेसाठी गावातील लोकांचे सहकार्य असेल तरच गावात स्वच्छता राहू शकते. म्हणून गाव स्वच्छ, निरोगी राखण्यासाठी वैरागड ग्रापंच्यावतीने स्वच्छतेसाठी गावात सूचनेचे फलक लावण्यात आले आहेत. गावकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी घुटके यांनी केले.
गावविकासासाठी चंग बांधल्यावर अशक्य काही नाही पण याला सहकार्य असणे आवश्यक आहे. दरवर्षी वैरागड येथे ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर नाल्याचा उपसा करण्याचे काम हाती घेतल्या जाते आणि ती वेळ नेमकी शेतीच्या कामाची असल्यामुळे मजुरांची दुर्मिळता निर्माण होत असे आणि गावातील अध्र्या अधिक नाल्याचा उपसा होत नसे. त्यामुळे पावसाचे पाणी सखोल भागात साचून राहते, घाण पाणी लोकांच्या घरात शिरते त्यामुळे लोकांची नेहमीची ओरड होती. या वर्षात एप्रिल महिन्यातच गावातील सर्व नाल्याचा उपसा झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होणार नाही. सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी घुटके यांनी या वर्षात स्वच्छतेची मोहीम राबवून गावाच्या बाहेरील व अंतर्गत रस्त्यावर ज्या ठिकाणी लोक केरकचरा टाकून कचर्‍याचे मोठे ढिग तयार केले होते. त्या ठिकाणचा कचरा ट्रॅक्टरला फरडा लावून स्वच्छ करण्यात आला. व त्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन करणारे सुचना फलकही लावण्यात आले. (वार्ताहर)
 

Web Title: Clean up panel for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.