शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या पत्रामुळे ताडाळी येथील नागरिक संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचे निवेदन : समस्या सोडविण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोडपेठ : ताडाळी येथील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करून गावालगतअसलेल्या रेल्वेच्या पुलाखालून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीला रेल्वेचे पत्र प्राप्त झाले आहे. सोबतच ताडाळी येथून तिसऱ्या रेल्वे लाईनच्या प्रस्तावित कार्याला कागदोपत्री सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेल्वेने रहदारीसाठी सुचविलेला पुल येत्या काळात राहील की, नाही याबद्दल ताडाळी ग्रामपंचायत व नागरिक संभ्रमात पडले आहेत.मध्य रेल्वेच्या भांदक येथील कार्यालयातून ग्रामपंचायत ताडाळी कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. त्यानुसार रेल्वे फाटक क्र. ३९ बी कायमस्वरूपी बंद करून गावालगतच्या पुलाखालून रहदारीसाठी मार्ग खुला राहील, असे सुचविण्यात आले. सदर पत्र प्राप्त होताच ग्रामपंचायत कार्यालयाकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. ताडाळी गावातून जाणारी प्रस्तावित तिसरी रेल्वे लाईन व ग्रामस्थांचा बंद होणारा मुख्य रस्ता याविषयी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढण्यासाठी ही ग्रामसभा महत्वाची ठरणारी होती. मात्र रेल्वे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी या ग्रामसभेला उपस्थित झाले नसल्याचे ग्रामपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.उड्डाणपुलाची मागणीताडाळी हा एमआयडीसी परिसर असून परिसरातील कारखाण्यांमुळे येथे कामगार व मजूर वर्गाची संख्या मोठी आहे. सोबतच पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच पा्रथमिक आरोग्य केंद्र यामुळे गावात सतत गजबज असते. शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे भविष्यात रहदारीची समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार रहदारीसाठी पायी मार्ग असावा व वाहनांसाठी उड्डाणपूल असावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत ताडाळीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांच्यासह सरपंच इंदिरा कासवटे, उपसरपंच क्रीष्णा बाम, ग्राम पंचायत सदस्य सुबोध कासवटे, साईबाबा झाडे, ज्योती आसेकर, प्रफुल गोठी, मनोज चिवंडे, कवडू दिवसे, खुशाल चिवंडे, अभय चिवंडे, दिनेश आमटे, पवन चनकापुरे, सुवर्णा सुरपाम यांच्या शिष्टमंडळाने संबंधितांना निवेदन दिले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे