शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

पुतळा अवहेलनाप्रकरणी नागरिकांचा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: January 14, 2016 01:36 IST

दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या अवहेलना प्रकरणाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.

तीव्र पडसाद : प्रकरण कन्नमवारांच्या पुतळा स्वच्छतेचेचंद्रपूर : दिवंगत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या अवहेलना प्रकरणाचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. जिल्हा बेलदार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र रोष व्यक्त केला असून महापौर आणि महानगर पालिकेच्या कारभाराविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. चंद्रपूर जिल्हा बेलदार समाज संघटनेच्या सुमारे २५ पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह सायंकाळी महापौरांना भेटण्यासाठी महानगर पालिकेत गेले होते. मात्र पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी जायचे असल्याचे सांगून महापौर राखी कंचर्लावार यांनी भेट टाळल्याचा अनुभव या शिष्टमंडळाला आला. या प्रकाराबद्दल नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. महापौरांना पुतळा स्वच्छ करण्यासाठी आणि नागरिकांना भेटण्यासाठीही वेळ नसेल तर, आंदोलनाच्या मार्गाने प्रश्न सोडवावा लागेल, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. दरम्यान, कन्नमवारांच्या पुतळ्याची अवहेलना आणि स्वच्छतेच्या मुद्यावरून येत्या पंधरा दिवसात महानगर पालिकेने दखल घेतली नाही तर पुतळयासमोरच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हा बेलदार समाज संघटनेचे अध्यक्ष विजय बोरगमवार आणि उपाध्यक्ष अशोक इंगुलकर यांनी दिला आहे. या प्रकाराबद्दल गुरूवारी पालकमंत्र्यांना भेटून त्यांच्यापुढे हा प्रकारही कथन केला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुतळा परिसरात होर्डिंगला परवानगी नाकाराजटपुरा गेटजवळील मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्यासमोर उभारल्या जाणाऱ्या होर्डिंगला महानगर पालिका कशी काय परवानगी देते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. न्यायालयाने होर्डिंग अवैध ठरविले असतानाही महापौर राखी कंचर्लावार यांच्या परवानगीने हे होर्डींग पुतळ्यासमोर लागलेले चालतात. मात्र पुतळयासभोवताल असलेली घाण स्वच्छ करणे त्यांना का जमत नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या होर्र्डिंगमुळे पुतळा दिसत नाही. फुटपाथ व्यावसायीकही अतिक्रमण करतात. पुतळ्यासमोरच एक चारचाकी वाहन नेहमी पार्किंग केलेले असते. त्यावरही कारवाई होत नाही. महानगर पालिका आणि प्रशासन या प्रकाराची दखल घेणार नसेल तर आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून विजय बोरगमवार, अवधुत कोटेवार, अशोक इंगुलवार, अनिल बोरगमवार, वसंत आकुलवार, शंकर डांगेवार, सचिन पेशट्टीवार, सुरेश पुल्लावार आदींनी दिला आहे.