शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मोदींच्या नेतृत्वात चौफेर विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:05 IST

पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभुर्णा येथे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देअमिषा पटेल : पोंभूर्णा येथे भाजपची प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभुर्णा येथे भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार आदींची उपस्थिती होती. आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांवर भर देत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेली विकासाची कामे तसेच महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीमुळे ते विजयी होतील, असेही अमिषा पटेल म्हणाल्या. अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात कॅन्सर हॉस्पीटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सैनिकी शाळा, वन अकादमी, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचडोह बॅरेज, पळसगाव-आमडी उपसासिंचन माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती, घाटकुळ ब्रिज, पोंभुर्णा येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, आदिवासी महिलांची पहिली कुक्कूटपालन सहकारी संस्था, टुथपिक उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, टाटा ट्रस्टच्या सहाय्याने समृध्द, सदन शेतकरी प्रकल्प, असे विकासाचे विविध टप्पे आम्ही या जिल्हयात जनतेला अनुभवायला दिले आहेत. हा विकासच आमचे शक्तीस्थळ असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले. यावेळी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शंकरपूर येथे विजय संकल्प सभाशंकरपूर : चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे भाजप-सेना- रिपाइं (आ) महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रचारसभा सोमवारी शंकरपूर येथे सभा झाली. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, राज्याचा अर्थमंत्री असलो तरी जिल्ह्याचा नागरिक असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी भरपूर निधी देणार आहे. सरकारने अनेक योजना सुरू केल्या. युरियाचे भाव स्थिर ठेवले. चंद्रपूर आदर्श कृषी जिल्हा करण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देण्याचे प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मेड इन पाकिस्तान असल्याची टिकाही ना. मुनगंटीवार यांनी केली. यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडीया, वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, दिगंबर गुरपुडे, नगराध्यक्ष हिरे, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.दिलीप शिवरकर व संचालन अजहर शेख, विवेक कापसे यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019chandrapur-pcचंद्रपूर