शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

कायदा असतानाही बालमजुरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:32 IST

सध्या महागाईच्या युगात कुटुंब प्रमुखांचे राबणे अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी पुरसे ठरत नाही.

कायद्याचे उल्लंघन : जनजागृतीचा अभाव कारणीभूतलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या महागाईच्या युगात कुटुंब प्रमुखांचे राबणे अनेक ठिकाणी उदरनिर्वाहासाठी पुरसे ठरत नाही. त्यामुळे कायदा असूनही अनेक प्रतिष्ठानात व लघुउद्योगात आजही बालमजूर राबताना दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बालमजुरांची आकडेवारी शासनदरबारी नसली तरी हजारो शाळाबाह्य मुले चाकरी करताना दिसूृन येतात.१९४८ पासूनच बालमजुरांसाठी कायदा अस्तित्वात आला. पुढे या संदर्भात अनेक कायदे आले. मात्र अद्यापही या कायद्यांचे पालन होताना दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ ३० टक्के लोक दारिदे्ररेषेखाली जीवन जगतात. त्यांच्या घरातील आई-वडील हे दोघेही कुटुंब प्रमुख मोलमजुरी करतात. काही वेळा तर त्यांच्या हाताला कामही मिळत नाही. याशिवाय सध्याच्या महागाईच्या युगात त्यांना मिळणाऱ्या मजुरीतून कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. अशावेळी १२ ते १४ वर्षाच्या मुलांना कामावर लावले जाते. एकदा का मुलगा मजुरी करायला लागला की त्याचे बालपण त्याचवेळी करपते. तो पुन्हा बाल्यावस्थेत परत येत नाही. विविध बांधकामात, हॉटेल्स, व्यापारी प्रतिष्ठाने, वर्कशॉप, मोटर गॅरेज, शेतकाम, विटभट्टी, भाजीपाला दुकाने, किराणा व्यवसाय, जनरल स्टोअर्स, कपड्यांची दुकाने आदी प्रतिष्ठानांसह अनेक लघु उद्योगातही बालकामगारांना कामावर घेतले जाते. बालकामगाराला कमी मजुरी दिली तरी चालते, या भावनेतून प्रतिष्ठानाचे मालकही त्याला सर्रास कामावर घेतात. प्रारंभी या बालकामगारांना हलकी कामे दिली जातात. त्यानंतर सराव होताच जड कामेही करवून घेतली जातात. शहराच्या गल्लीबोळात बालकामगार राबत असल्याचे दिसून येत असतानाही कामगार आयुक्तांकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. एखाद्याने तक्रार केलीच तर कारवाई केली जाते. प्रतिष्ठान मालकांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. अशा कारवाया चंद्रपूर जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतक्या झाल्या आहेत. वास्तविक याबाबत कामगार आयुक्त, महिला व बालकल्याण, बाल विकास प्रकल्प आदींनी संयुक्तपणे याबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे. कारण जनजागृतीचा अभाव आणि महागाईत पैशाची गरज यातूनच बालमजूर समाजात अस्तित्वात आला आहे.पालक जागरूक असावेतुबालकामगारांसाठी कायदा असला तरी कायद्याची अंमलबजावणी पाहिजे तशी होताना दिसून येत नाही. एखाद्याने तक्रार केल्यास धाडसत्र राबविले जाते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात असते. काही ठिकाणी पाठ्यपुस्तकांसाठी बालमजूर काम करताना दिसतात. वास्तविक बालमजुरी थांबविण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसोबत पालकांमध्ये जनजागृतीही करणे गरजेचे आहे. बालकांसाठी कोणत्या योजना आहेत, याची माहितीच अनेक पालकांना नसते.