चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरखाली दबून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 14:26 IST2018-05-18T14:26:13+5:302018-05-18T14:26:22+5:30
बाखर्डी येथील अंतरगाव शेतशिवारात ट्रॅक्टरनी शेतात रोटावेटर करत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरखाली दबून बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: बाखर्डी येथील अंतरगाव शेतशिवारात ट्रॅक्टरनी शेतात रोटावेटर करत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून एका १२ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. उज्वल निलेश महाकुलकर रा. निमणी असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील कढोली खु येथील विलास पिंपळशेंडे यांचे शेतात घडली.
उज्वल हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कढोली येथे मामाच्या गावाला गेला होता कढोली येथील रहिवासी नितेश परागे हे ट्रॅक्टरने शेतात रोटावेटर करत असताना यावेळी उज्वल व वैभव हा त्यांच्यासोबत ट्रॅक्टरच्या इंजिनवर बसला होता. यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने तो ट्रॅक्टरच्या मागील चाकात व रोटावेटर मध्ये सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचा मामा वैभव आस्वले व शंकर कोटनाके हे जखमी झाल्याने त्यांना गडचांदूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले तर वैभव आस्वले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
कढोली येथील पोलीस पाटील सविता संदीप लांडे यांच्या तक्रारीवरून कोरपना पोलिसांनी ट्रॅक्टर मालक श्यामा सोनेकर गोयगाव ट्रॅक्टरचालक नितेश परागे व शंकर कोटनाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उज्वल हा निमणी येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.