शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचा कापूस परजिल्ह्याच्या बाजारपेठेत

By admin | Updated: December 30, 2015 01:45 IST

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी स्थानिक बाजारपेठात दराच्या मोठ्या तफावतीमुळे कापूस परजिल्ह्यात विक्रीस नेत आहे.

भावात मोठी तफावत : शेतकऱ्यांची बाजारपेठेसाठी भटकंती जयंत जेनेकर कान्हाळगाव (कोरपना)जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी स्थानिक बाजारपेठात दराच्या मोठ्या तफावतीमुळे कापूस परजिल्ह्यात विक्रीस नेत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्रातील आवक मंदावली आहे.जिल्ह्यात कोरपना, वरोरा, चंद्रपूर, राजूरा, जिवती, भद्रावती, चिमूर तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नापिकी व नैसर्गिक संकटामुळे आधीच उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यावर वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. भाव वाढणार असे भाकीत वर्तविले जात असले तरी, रोज बाजारपेठांतील दरात बरीच तफावत दिसून येत आहे. या कारणाने व आर्थिक चणचणीमुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस वळता करणे सुरू केले आहे. परंतु जिल्ह्यात असलेल्या वरोरा, कोरपना, माढेळी, राजुरा, चंद्रपूर, चिमूर येथील बाजारपेठेत ४ हजार १०० च्या वर कापसाचा दर सरकलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस परजिल्ह्यात हिंगणघाट, वणी, आदिलाबाद, बेला, चिमणाझरी (जाम) येथे विक्रीला नेणे सुरू केले आहे. यात हिंगणघाट व चिमणाझरी (जाम) बाजारपेठेत असलेल्या दररोजच्या वाढत्या दरामुळे शेतकरी अधिक विक्रीला नेत आहेत. कोरपना व नागपूर मार्गे जिल्ह्यातील कापूस दररोजच्या दररोज ४० ते ५० मॅटडोर भरून चालला आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठा ओस अन् परजिल्ह्यातील बाजारपेठा फुल्ल दिसून येत आहेत.