शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

समाजहिताच्या कार्यक्रमात चंद्रपूर प्रथम असावे

By admin | Updated: September 3, 2016 00:32 IST

समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून...

सुधीर मुनगंटीवार : महाअवयवदान अभियानाचा समारोपचंद्रपूर : समाजाच्या हिताचे कोणतेही कार्यक्रम राबविताना राज्याचे अथवा देशाचे न समजता ते समाज हिताचे कार्यक्रम समजून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा. अशा सामाजिक हिताच्या कार्यक्रमात आपला चंद्रपूर जिल्हा प्रथम राहावा, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाअवयवदान जनजागृती अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यु.व्ही.मुनघाटे व आयएमएचे अध्यक्ष डॉ.प्रमोद बांगडे उपस्थित होते.यावेळी ना. मुनगंटीवार यांनी महाअवयवदान जनजागृती अभियान कार्यक्रम हा तीन दिवसांचा नसून संपूर्ण ३६५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अवयवदान अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन समाजाला जागृत केल्याने एका माणसापासून आठ व्यक्तींचे प्राण वाचू शकते. अशा अभियानामध्ये मोठया संख्येने नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे अवयवदान एक महान कार्य असून एका मृत व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवन देण्याइतके दुसरे कोणतेही पुण्याचे काम असू शकत नाही. याची जाण ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अवयवदानाची चळवळ संपूर्ण देशात उभारली असल्याचेही ते म्हणाले. या अवयवदान अभियानाच्या जनजागृतीनिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कविता बिशोई, द्वितीय प्रणय वानकर, तृतीय सुरज गुरनुले यांना तर निबंध स्पर्धेत प्रफुल मेश्राम, निकिता ठेंगणे व राहुल काळे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. रांगोळी स्पर्धेत प्रतिभा राठोड, मुयरी वाघडे व प्रिया गिरी यांना पारितोषिक मिळाले. (प्रतिनिधी)