शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जागा वाटप : भाजपचे सस्पेन्स, काँग्रेसमध्ये खलबते;वडेट्टीवारांचा चंद्रपुरात ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:17 IST

Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. भाजपच्या यादीवर मुंबईत शिक्कामोर्तब होण्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे बैठकांचे सत्रच सुरू आहे. उमेदवारी वाटपावरून नेत्यांची कसोटी लागत आहे. इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे बंड थोपवण्याचे मोठे आव्हान आहे. उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नेते विजय वडेट्टीवार चंद्रपुरात ठिय्या मांडून आहेत.

जागा वाटपासाठी काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. दरम्यान, काही जागांवरून रस्सीखेच झाल्याचे समजते. काहींचे तिकीट कापण्याचीही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सोमवारी पुन्हा अशाच प्रकारची बैठक उभय नेत्यांमध्ये होणार असल्याचे समजते. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपचे मुंबईत ठरणार

भाजपमधील उमेदवारीचा तिढा मुंबईत पोहोचला आहे. उमेदवारांची यादी तयार झालेली आहे. पक्षात एकवाक्यता नसल्याच्या बातम्यांमुळे इच्छुकांची चांगलीच घालमेल सुरू आहे. कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाची कापली जाईल, हा संभ्रम कायम आहे. स्थानिक नेत्यांमध्ये एकमत नसल्यामुळे भाजपत अत्यंत गोपनीयता बाळगली जात आहे.

काय म्हणाले, आमदार वडेट्टीवार

याबाबत आमदार वडेट्टीवार यांच्याशी चर्चा केली असता काँग्रेसमधील उमेदवारांची यादी जवळपास निश्चित झालेली आहे. पक्षातील नेत्यांचीही या यादीवर २० टक्के सहमती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सोबत घेण्याच्या अनुषंगाने विचार विनिमय सुरू आहे. त्यांना कोणत्या आणि किती जागांवर त्यांची ताकद आहे. या दृष्टीने विचार सुरू आहे. काँग्रेस जेथे निवडून येण्याची दाट शक्यता आहे. अशा जागा सोडणार नाही. रिपाइं खोब्रागडे गट सोबत आहे. या दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी चार जागांची मागणी असून त्यावर विचार सुरू आहे. याबाबत लवकरच तोडगा निघेल, असेही ते म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Seat Allocation: BJP Suspense, Congress Discussions, Vadettiwar Stays Put

Web Summary : Chandrapur faces suspense over candidate lists as the deadline nears. BJP's list awaits Mumbai approval, while Congress holds ongoing meetings, led by Vijay Vadettiwar, to resolve seat-sharing issues and prevent rebellion, also considering alliances with smaller parties.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाcongressकाँग्रेस