शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या गाडीला व्हीआयपी नंबरसाठी चंद्रपूर मनपाने मोजले ७० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:55 IST

Chandrapur News मनपाने महापौरांसाठी गरज नसताना नवे वाहन खरेदी केले. केले तर केले, हा प्रकार इथपर्यंतच थांबला नाही, तर मनपा प्रशासनाने या वाहनावर आरटीओच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल ७० हजार रुपये मोजले आहेत.

ठळक मुद्देएकीकडे विकासासाठी निधी नसल्याची ओरड आणि दुसरीकडे उधळपट्टी

 लोकमत न्यूज नेटवर्क  चंद्रपूर : एकीकडे कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या मनपाने दुसरीकडे निधीची उधळपट्टी सुरू केली आहे. मनपाने महापौरांसाठी गरज नसताना नवे वाहन खरेदी केले. केले तर केले, हा प्रकार इथपर्यंतच थांबला नाही, तर मनपा प्रशासनाने या वाहनावर आरटीओच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल ७० हजार रुपये मोजले आहे. नवे वाहन खरेदी करण्यासाठी आणि त्यावर ७० हजार रुपयांच्या व्हीआयपी क्रमांकासाठी निधी कुठून आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी एक्सएल एल्फा नेक्सा कंपनीचे वाहन खरेदीसाठी ११ लाख १८ हजार १६८ रुपये मंजूर केले. हे वाहन महापौरांसाठी वापरण्यात येणार असल्याने या वाहनाकरिता एचएच ३४ बीव्ही ११११ या व्हीआयपी क्रमांकाकरिता ७० हजार रुपये आगाऊ मोजले आहे. वाहनाची मूळ किंमत १० लाख ४१ हजार १३१ रुपये इतकी आहे. व्हीआयपी क्रमांकासाठीचे ७० हजार रुपये असे मिळून ११ लाख १८ हजार १६८ रुपये मनपाचे मोजले आहे.

ही धक्कादायक माहिती संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार