चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण : एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी रवींद्रपाल सिंग हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:26 IST2026-02-05T15:25:16+5:302026-02-05T15:26:32+5:30

Chandrapur : जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणामध्ये आरोपी असलेले दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग जसपाल सिंग यांनी स्वतः विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Chandrapur kidney sale case: Accused Ravindrapal Singh moves High Court to quash FIR | चंद्रपूर किडनी विक्री प्रकरण : एफआयआर रद्द करण्यासाठी आरोपी रवींद्रपाल सिंग हायकोर्टात

Chandrapur kidney sale case: Accused Ravindrapal Singh moves High Court to quash FIR

परिमल डोहणे 
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्ह्यातील बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणामध्ये आरोपी असलेले दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग जसपाल सिंग यांनी स्वतः विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी रवींद्रपाल सिंग यांच्यासह मुख्य सूत्रधार डॉ. क्रिष्णा, एजंट हिमांशू, त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोंविदसामी व सहा सावकारांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तेव्हापासून रवींद्रपाल सिंग फरार आहेत. त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातील कलम २२ अनुसार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार नाही, असा दावा करून एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. रोशन कुडे, असे किडनी विकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ते नागभीड तालुक्यातील मिथूर येथील रहिवासी आहेत. व्यवसायाने शेतकरी असलेल्या कुडे यांनी सावकार प्रदीप बावनकुळेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाकरिता कुडे यांचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे त्यांनी कम्बोडिया येथे किडनी विकली. या रॅकेटमध्ये रवींद्रपाल सिंगसह इतर आरोपी सामील आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जामिनावर आज अंतिम सुनावणी

डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठीही उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांच्यापुढे गुरुवारी अंतिम सुनावणी होणार आहे

Web Title : चंद्रपुर किडनी बिक्री मामला: आरोपी ने एफआईआर रद्द करने के लिए हाईकोर्ट में याचिका दायर की

Web Summary : चंद्रपुर किडनी बिक्री मामले में आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंह ने अपने खिलाफ एफआईआर रद्द करने के लिए नागपुर उच्च न्यायालय में याचिका दायर की। उनका दावा है कि पुलिस के पास मानव अंग प्रत्यारोपण कानूनों के तहत जांच करने का अधिकार नहीं है। उन्होंने अग्रिम जमानत भी मांगी है; आज अंतिम सुनवाई है।

Web Title : Chandrapur Kidney Sale Case: Accused Seeks FIR Cancellation in High Court

Web Summary : Dr. Ravindrapal Singh, accused in the Chandrapur kidney sale case, petitioned the Nagpur High Court to quash the FIR against him. He claims police lack authority to investigate under human organ transplant laws. He is also seeking anticipatory bail; final hearing is today.