शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरला पडतोय गर्दचा विळखा

By admin | Updated: December 14, 2015 00:52 IST

जिल्ह्यात दारूबंदीनंतर व्यसनाधिनांनी गांजा आणि गर्दसारख्या विषारी व्यसनांना जवळ केले असल्याचे दिसून येत आहे.

गांजाची विक्रीही जोमात : दुर्गापुरात एकाला अटक, पाळत ठेवून केली कारवाईचंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदीनंतर व्यसनाधिनांनी गांजा आणि गर्दसारख्या विषारी व्यसनांना जवळ केले असल्याचे दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर गर्द आणि गांजा विकला जात आहे. या विक्रीवर निर्बंध आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी शनिवारी रात्री एका गर्द विक्रेत्याला अटक करून त्याच्या मुसक्या आवळल्या. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अयप्पा मंदिर जवळील चेकपोस्टच्या बाजुला एका पानठेल्यासमोर मध्यरात्री १२.३० वाजतानंतर एक गर्द विक्रेता ग्राहकांना अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक के.टी.रामटेके, डी.आर.बांडे, सहायक फौजदार पिपरे, नायक पोलीस शिपाई मनोहर मत्ते, विनोद यादव, रजनिकांत पुठ्ठावार, पोलीस शिपाई धीरज लोधी, आनंद खरात, संदीप कामडी, चालक संतोष राऊत यांनी अयप्पा मंदिर परिसरात सापळा रचला. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास एक इसम तेथे आला. पोलिसांनी लगेच त्याला पकडून त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गर्द ठेऊन असलेल्या ३४ कागदी पुड्या आढळून आल्यात. त्यात २५०० रुपये किंमतीची अडीच ग्रम गर्द होती. यासोबतच १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल, रोख दोन हजार ३० रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दुर्गापूर पोलीस ठाण्यात गर्द विक्रेत्याविरुद्ध कलम ८ (कक़ २१ एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास दुर्गापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी.आर.बांडे करीत आहेत. (प्रतिनिधी)