शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur Election Results 2026 : चंद्रपुरात काँग्रेसने रोखली भाजपची हॅट्रिक ! नगर परिषद निकालांचे पडसाद मनपाच्या निकालावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 13:37 IST

Chandrapur : महापालिका स्थापनेच्या पहिल्याच टर्ममध्ये सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेसला दीर्घकाळासाठी अनुकूल स्थिती होती. मात्र, पक्षातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सत्तेची समीकरणे बदलली. पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महापालिका स्थापनेच्या पहिल्याच टर्ममध्ये सत्तारूढ झाल्यानंतर काँग्रेसला दीर्घकाळासाठी अनुकूल स्थिती होती. मात्र, पक्षातीलच काही नगरसेवकांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सत्तेची समीकरणे बदलली. पुढे भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेस पिछाडीवर गेली. अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भाजपशी घरोबा केला. या निवडणुकीत ६६ पैकी तब्बल २७ जागांवर वर्चस्व मिळवत काँग्रेसने महापालिकेत दमदार 'एन्ट्री' केली आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने एकहाती ३६ जागांवर विजय मिळवून सत्ता काबीज केली होती. त्यावेळी पक्षात बंडखोरी नसतानाही काँग्रेसला १२ जागांच्या पुढे जाता आले नाही. भाजपने सलग दोन टर्म एकहाती सत्ता राबवून काँग्रेसला बॅकफूटवर नेले. या कालावधीत भाजपला केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेचे भक्कम पाठबळ होते. भाजपची सत्ता असलेल्या पालिकेचा पंचवार्षिक कालावधी २०२२ मध्ये संपला. तेव्हापासून पालिकेवर प्रशासकराज सरू आहे. भाजपकडे डबल इंजिन सरकार असल्याने काँग्रेस या निवडणुकीला कशी सामोरे जाते, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तिकीट वाटपात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर मात केली. आपल्या समर्थकांना उमेदवारी देऊन वडेट्टीवार समर्थकांना दूर सारले, तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील गटबाजी उफाळून आली. परिणामी, उमेदवारी नाकारलेल्या २० उमेदवारांनी भाजपविरोधात बंडखोरी करून रिंगणात उतरले होते. भाजपच्या उघड गटबाजीने अनेक प्रभागांत काँग्रेससाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.

भाजप ३६ वरून १८ वर घसरली २०१७ मध्ये १२ जागा जिंकलेल्या काँग्रेसने थेट २७जागांवर वर्चस्व मिळविले. तिकीट नाकारलेले वडेट्टीवार समर्थक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांनीही अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. मात्र, २०१७ चे यश भाजपला राखता आले नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने मनपातही विजय मिळविल्याने भाजपत खळबळ उडाली. भाजपतील अंतर्गत गटबाजी व पालिकेतील पिछाडीचे पडसाद जि. प. व प.स. निवडणुकीवर उमटण्याची चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress halts BJP's hat-trick in Chandrapur 2026 election results.

Web Summary : Congress secured 27 seats in Chandrapur, halting BJP's dominance. Internal BJP conflicts and strategic ticket distribution favored Congress. The municipal results may influence upcoming local elections.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६