शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्याला सरकारी कापूस खरेदीचा मुहूर्त मिळेना

By admin | Updated: November 18, 2015 01:09 IST

शेतकऱ्यांच्या घरात आज मोठ्या प्रमाणात कापूस भरून आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकूण आपली आर्थिक गरज भागविली.

शेतकरी हतबल : लाख मोलाचा कापूस खासगी व्यापाऱ्यांच्या घशातगोवरी : शेतकऱ्यांच्या घरात आज मोठ्या प्रमाणात कापूस भरून आहे. काही शेतकऱ्यांनी गरजेपोटी कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकूण आपली आर्थिक गरज भागविली. सरकारी कापूस संकलन केंद्र आज ना उद्या सुरू होईल या आशेवर शेतकरी आहे. कापसाचा हंगाम भरात आला असताना एकही कापूस केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याच्या खरेदीसाठी शासकीय यंत्रणाच हतबल झाली काय? असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ नोव्हेंबरला नागपुरात सरकारी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू होईल अशी आस शेतकऱ्यांना होती, मात्र मोजक्याच ठिकाणी सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू झाले. परिणामी विदर्भ प्रदेशात कापूस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात अजुनपर्यंत सरकारी कापूस खरेदी सुरु झाली नाही. त्यामुळे नाईलाजाने कापूस कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी आर्थिक अडचणीत गेली. दिवाळीला अख्खा आसमंत दिव्यांच्या लख्ख प्रकाशात उजळून निघाला असताना शेतकऱ्यांच्या घरी मात्र अंधार अधिकच गडद झाला होता. दिवाळी वर्षातला सर्वात मोठा सण असतानाही ती शेतकऱ्यांना पैशाअभावी साजरा करता आला नाही. राज्यात सरकारी कापूस खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यातील कापूस संकलन केंद्र सुरू होणार होते. त्यात कापसाच्या (वणी झोन) क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे एकमेव कापूस संकलन केंद्र सुरू करण्याचा शासनाचा मानस होता.जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, महाकुर्ला, वरोरा, माढेळी या पाच ठिकाणी शासकीय कापूस खरेदी सुरू केली जाते. मात्र दिवाळी उलटून गेली तरी अद्यापही शासनाने कापूस खरेदीचा श्रीगणेशा केला नाही. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर एकही राजकीय नेता बोलायला तयार नाही. शेतात दिवस-रात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी पूरता काकुळतीला आला आहे. कापूस शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापसाच्या पिकांवर चालतो. परंतु शासनाने कापूस पिकाला तोकडा हमीभाव जाहीर केला आहे. एवढ्या कमी दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला खर्चही भरून निघणार नाही. मग नुकसान सहन करून कापूस विकायचा काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना दिवस-रात्र छळतो आहे. (वार्ताहर)