चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 12:42 IST2021-05-18T12:42:14+5:302021-05-18T12:42:27+5:30
दररोज चार-पाच रुग्ण आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांमध्ये मधुमेह आजाराचे रुग्ण 95 टक्के आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 48 वर, 26 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया
चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनासह आता म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब आरोग्य विभागासाठी चिंतेची आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या तब्बल 48 वर पोहचली आहे. यातील 26 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी 'लोकमत'ला दिली.
दररोज चार-पाच रुग्ण आढळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांमध्ये मधुमेह आजाराचे रुग्ण 95 टक्के आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांनाच म्युकरमायकोसिसचा आजार जडल्याचे दिसून येत आहे, ही बाब चिंताजनक असल्याचेही डॉ राठोड यांनी म्हटले आहे.