'चाकणकारांचा राजीनामा पुरेसा नाही; सहआरोपी करून गुन्हे दाखल व्हायला हवे' सुषमा अंधारेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:02 IST2026-03-23T16:01:11+5:302026-03-23T16:02:40+5:30

Chandrapur : कॅप्टन खरात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मुळात राजीनामा नाहीच. आता निघा तुमची गरज नाहीये, असे सर्वांनी सांगितल्यावर रूपाली चाकणकर पदावरून पायउतार झाल्या आहेत.

'Chakankar's resignation is not enough; cases should be registered by making her a co-accused', demands Sushma Andhare | 'चाकणकारांचा राजीनामा पुरेसा नाही; सहआरोपी करून गुन्हे दाखल व्हायला हवे' सुषमा अंधारेंची मागणी

'Chakankar's resignation is not enough; cases should be registered by making her a co-accused', demands Sushma Andhare

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
कॅप्टन खरात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मुळात राजीनामा नाहीच. आता निघा तुमची गरज नाहीये, असे सर्वांनी सांगितल्यावर रूपाली चाकणकर पदावरून पायउतार झाल्या आहेत. अर्थात राजीनामाही पुरेसा नाही. या प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सह आरोपी केले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण त्याच्याशिवाय खुलासे होऊ शकणार नाहीत. या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या दोन दिवसानंतर मी स्वतः पुढे आणणार आहे, असे शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

चंद्रपूर येथे रविवारी (दि. २२ मार्च) सायंकाळी माध्यमांशी त्या बोलत होत्या. खरात प्रकरणात अनेक लोकांची नावे येण्याची शक्यता आहे. कदाचित ते राजकारणातले असतील. ते प्रशासनातले असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील. महाराष्ट्रातल्या लोकांच्या इभ्रतेशी खेळायचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये, असे त्या म्हणाल्या. ज्यांनी महापालिकेत आमची वाट अडवायचा प्रयत्न केला, ज्यांनी चंद्रपूर महापालिकेत आमची नाकाबंदी करायचा प्रयत्न केला. आम्ही लोकसभेला त्यांची नाकेबंदी करू. अजून अडीच-तीन वर्ष वेळ आहे. ज्यांनी नाकेबंदी केली असेल त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल बाकीच्यांना मला बोलायची गरज नाही, अशा शब्दात अंधारे यांनी खासदार धानोरकर यांच्यावर प्रहार केला.

Web Title : चाकणकर का इस्तीफ़ा काफ़ी नहीं; आपराधिक आरोप दर्ज हों: सुषमा अंधारे

Web Summary : सुषमा अंधारे ने खरात मामले में रूपाली चाकणकर की गिरफ़्तारी, सह-आरोपी दर्जे और नार्को परीक्षण की मांग की। उन्होंने पर्दा डालने का आरोप लगाया और जल्द ही और खुलासे का वादा किया। अंधारे ने शिवसेना (यूबीटी) की प्रगति में बाधा डालने के खिलाफ चेतावनी दी, भविष्य के चुनावों में जवाबी कार्रवाई की कसम खाई।

Web Title : Chakankar's resignation insufficient; file criminal charges, make co-accused: Sushma Andhare

Web Summary : Sushma Andhare demands Rupali Chakankar's arrest, co-accused status, and narco test in the Kharat case. She alleges a cover-up and promises further revelations soon. Andhare warns against obstructing Shiv Sena (UBT)'s progress, vowing retaliation in future elections.