महामार्गावर कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST2021-06-30T05:00:00+5:302021-06-30T05:00:33+5:30
राजकुमार नामदेव दोडके ( ३५) रा. मोहाळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार आपले काम आटोपून एमएच ३४ बीडब्ल्यू ४५५३ या क्रमांकाच्या दुचाकीने कानपावरून मोहाळीला परत येत होता. यादरम्यान नागभीडकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ३१ बीव्ही १६९५ या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राजकुमारचा जागीच मृत्यू झाला.

महामार्गावर कारची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कानपा-नागभीड राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बिकली फाट्याजवळ मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
राजकुमार नामदेव दोडके ( ३५) रा. मोहाळी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार आपले काम आटोपून एमएच ३४ बीडब्ल्यू ४५५३ या क्रमांकाच्या दुचाकीने कानपावरून मोहाळीला परत येत होता. यादरम्यान नागभीडकडून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच ३१ बीव्ही १६९५ या क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राजकुमारचा जागीच मृत्यू झाला. या महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी राजकुमारला ओळखताच गावात ही माहिती दिली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.