वैष्णवीच्या अन्यायासाठी यंग चांदा ब्रिगेडचा कॅंडल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:38+5:302021-09-22T04:31:38+5:30
चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने इंदिरा नगर येथे कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी वैष्णवी ...

वैष्णवीच्या अन्यायासाठी यंग चांदा ब्रिगेडचा कॅंडल मार्च
चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने इंदिरा नगर येथे कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी वैष्णवी आंबटकर हिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
एकतर्फी प्रेमातून ३५ वर्षीय प्रफुल आत्रामने वैष्णवी आंबटकर हिच्यावर चाकूहल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आदी मागण्या घेऊन यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. इंदिरा नगर येथील विश्वशांतील बुध्द विहाराजवळून कॅंडल मार्चला सुरुवात झाली. मूल रोडजवळील रेल्वे रुळाजवळ स्व. वैष्णवी आंबटकर हिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, उपाध्यक्ष नरेश आत्राम, एसबीसी प्रमुख रुपेश मुलकावार, सिद्धार्थ मेश्राम, शकील शेख, अशोक तुमराम, नितेश बोरकुटे, सतीश सोनटक्के, गणेश इसनकर, नवीन चांदेकर वैशाली मेश्राम, प्रीती मडावी, नंदिनी मेश्राम, नीलिमा चांदेकर, मीनू जमगडे, माधुरी पेंडोर, उषा मेश्राम, जोत्स्ना कुळमेथे, यशोधा उईके, लता मेश्राम, सावंत उईके, शिवा तुरणकर, बाळू कुळमेथे आदींची उपस्थिती होती.