शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यात रस्त्यावरूनच पकडावी लागते बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST

कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या.

ठळक मुद्दे२७ वर्षांतील आश्वासने हवेत : बसस्थानकाअभावी प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आणि तेलंगणा राज्याचा सीमावर्ती भाग लागून असलेल्या कोरपना येथे अद्याप बसस्थानकाची निर्मिती न झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुका निर्मितीला २७ वर्षे झाले. नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र हवेत विरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कोरपना शहरातील कापसाची बाजारपेठ पूर्व विदर्भातील सर्वात मोठी आहे. चंद्र्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग व यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेल्या वणीकडे जाणारा मार्ग कोरपना शहराला जोडला आहे. त्यामुळे शहरात दिवसभर रेलचेल असते. परंतु, बसस्थानक उभारण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले नाही. भाजप व काँग्रेस सरकारच्या कालखंडात मोठ्या घोषणा झाल्या पण त्या हवेत विरल्या. तालुका निर्मितीच्या २७ वर्षांनंतरही बसस्थानक नसल्याने प्रवाशांना चक्क रस्त्यावरील पानटपरी व हॉटेल समोर उभे राहून बस पकडावी लागत आहे. या तालुक्यात विकासाचा मोठा अनुशेष आहे. सामाजिक कल्याणाच्या योजना तालुक्यात पोहोचल्या नाही. कोरपना शहरात राज्य परिवहन महामंडळाकडून कमी बसेस सोडल्या जातात. त्यातच बसस्थानक नसल्याने संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने कोरपन्यात बसस्थानक उभारावे तसेच वरोरा, पांढरकवडा, उमरेड, गडचिरोली, वर्धा, अहेरी, ब्रह्मपुरी, जिवती, केरामेरी, असिफाबाद, भद्रावती, रामटेक आदी बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चंद्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर बसफेऱ्या वाढवाघुग्घुस : चंद्र्रपूर- घुग्घुस- वणी मार्गावर कमी बसफेºया असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अजुनही सामान्य बसेसची संख्या वाढविली नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या वेळापत्रकानुसार चंद्र्रपूर-घुग्घुस मार्गावर अर्धा एक तासाने बस सोडण्याचा नियम आहे. मात्र या वेळापत्रकाचे कधीच पालन होत नाही, असा आरोप प्रवाशांनी केला. मागील आठ दहा महिन्यापूर्वी चंद्र्रपूर डेपोतून चंद्र्रपूर- घुग्घुस वणी आणि वणी डेपोतून वणी-घुग्घुस- चंद्र्रपूर जलद बसेस सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावरून घुग्घुस व वणी ये जा करणाºया प्रवाशांना सोय उपलब्ध झाली. पण, बहुतांश बसेस फुल्लं राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. यातून शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना सकाळी व सायंकाळी ताटकळत राहावे लागते. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी चंद्र्रपूर-घुग्घुस-वणी मार्गावर सामान्य बसेस वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.