लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मेटेपार येथील महिला घरी दुपारी गॅसवर चहा करीत असताना गॅसच्या ज्वाळा कुडाच्या घरातील भिंतीला लागल्या. त्यामुळे अचानक कुडाचे घर पेटू लागले. यात सिलिंडरचाही स्फोट झाल्याने संपूर्ण घरच जळून खाक झाले. ही घटना बुधवारी घडली.सुदैवाने सुनंदा पराते ही महिला, तिची आई व मुलगी घरातून बाहेर पडल्याने त्या बचावल्या. सुनंदा पराते ही महिला कुडाचे घर बांधून अनेक वर्षांपासून राहत आहे. चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत संपूर्ण घर, जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, कपडे, भांडी आदींची राखरांगोळी झाली. यात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. पटवारी जीवन येरमे यांनी पंचनामा केला.
सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:01 IST
चहा करीत असताना गॅस ज्वाळा कुडाच्या भिंतीला लागल्या. अचानक तिथे आग लागली. कुडाचे घर असल्यामुळे आग क्षणार्धात घरभर पसरली. सुनंदा, तिची आई पार्वता वाघ व मुलगी घराबाहेर पडली. त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिक येण्यापूर्वीच सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत संपूर्ण घर, जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, कपडे, भांडी आदींची राखरांगोळी झाली.
सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक
ठळक मुद्देमोठ्याप्रमाणात नुकसान : मेटेपार येथील घटना