शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

बीएस इस्पातचे कामगार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By admin | Updated: June 4, 2015 01:23 IST

मागील दोन दिवसांपासून वरोरानजीकच्या बीएस इस्पात कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यासंदर्भात काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

वरोरा : मागील दोन दिवसांपासून वरोरानजीकच्या बीएस इस्पात कंपनीच्या कामगारांनी विविध मागण्यासंदर्भात काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कामगारांनी बुधवारी वरोरा शहरातून थेट चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.वरोरा शहरानजीकच्या मजरा गाव शिवारात बीएस इस्पात कंपनी आहे. बीएस इस्पात कंपनीत स्थायी व अस्थायी कामगार कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापन मधील अधिकारी कामगारांना तुम्ही काम सोडून जावे, अन्यथा कामावरुन कमी करण्यात येईल, अशा धमक्या देत असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप कामगारांनी एका निवेदनाद्वारे मनसे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्याकडे केला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्याकरिता मनसेच्या वतीने पत्र देण्यात आले. परंतु चर्चा करण्यात आली नाही. याच्या निषेधार्थ मागील दोन दिवसांपासून कामगारांनी कंपनीचे काम बंद करुन आंदोलन सुरु केले. बुधवारी वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन केल्यानंतर मनसे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्या नेतृत्वात कामगार वाहनाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. जिल्हाधिकारी आता कोणता निर्णय घेतात, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)