राजुऱ्यातील नरेश गजभिये हत्या प्रकरणात दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 05:00 IST2022-04-14T05:00:00+5:302022-04-14T05:00:28+5:30

घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. महिलेला मारहाण करीत असताना सुमनबाई सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती   विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय बांधून घरातील पलंगाला बांधले. त्यानंतर मुलगा नरेशचा मृत्यू झाला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Both arrested in Rajura Gajbhiye murder case | राजुऱ्यातील नरेश गजभिये हत्या प्रकरणात दोघांना अटक

राजुऱ्यातील नरेश गजभिये हत्या प्रकरणात दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : येथील रामनगर वार्डात नरेश गजभिये या ४० वर्षीय युवकाचे हातपाय बांधून खून केल्याची घटना समोर आली. मृतक नरेश यांच्या आई सुमन गजभिये यांच्या तक्रारीनंतर दोन आरोपींवर भादंवि ३०४,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 
विठ्ठल आगलावे व प्रदीप माणुसमारे रा. रामनगर अशी आरोपींची नावे आहेत. मृतक नरेश यांच्या आई सुमनबाई प्रेमदास गजभिये यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार नरेश हा वेडसर असल्याने वार्डात शिवीगाळ व मारहाण करीत होता. घटनेच्या दिवशी मृतक हा शेजारील आशा आगलावे या महिलेला मारहाण करीत होता. 
महिलेला मारहाण करीत असताना सुमनबाई सोडविण्यासाठी गेली. मारहाणीची माहिती महिलेचे पती   विठ्ठल शंकर आगलावे यांना कळताच त्यांनी प्रदीप माणुसमारे यांच्या मदतीने नरेशचे हातपाय बांधून घरातील पलंगाला बांधले. त्यानंतर मुलगा नरेशचा मृत्यू झाला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पण केवळ हातपाय बांधल्याने नरेशचा मृत्यू झाला नाही, असे प्रत्यक्षदर्शिचे म्हणणे आहे.    नरेशचे हातपाय घट्ट बांधून त्याचा गळा आवळण्यात आला असावा, असा आरोप मृतकाच्या आईने केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

Web Title: Both arrested in Rajura Gajbhiye murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.