शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

By admin | Updated: February 24, 2016 00:55 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून क्लिनिक थाटले आहे.

गोंडपिंपरी : तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून क्लिनिक थाटले आहे. हा गोरखधंदा सुरू असताना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच प्रकार सुरू आहे. तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या विरोधात अनेकदा वृत्तपत्रात बातम्या आल्या. मात्र प्रशासनाने तालुक्यात सुरू असलेल्या अनाधिकृत उपचार केंद्रावर कुठलीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीेण रुग्णालये अस्तित्वात आहेत. मात्र प्रशासनातील आरोग्य विभागात काम करणारी मंडळी गावखेड्यामध्ये आरोग्य सेवा पोहचविण्यात कुचकामी ठरत असल्याने तालुक्यातील अनेक अनेक गावांमध्ये अर्धवरज्ञानी बोगस डॉक्टरांनी ठाण मांडून नागरिकांच्या जिवीताशी खेळण्याचा गंभीर प्रकार सुरू केल्याचे दिसून येते. यात बोगस डॉक्टर प्रसूती, रुग्ण, किरकोळ जखमींवर शस्त्रक्रिया, बड्या आजारांवरही उपचार करत असून गर्भपात व अन्य आजारांवरही उपचार करत असल्याची माहिती आहे. या संदर्भात गेल्या दिवसांपुर्वी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करुन या बोगस डॉक्टरांच्या अ‍ॅलोपॅथीक उपचार तर औषधालयातून यांच्याच मार्फत केलेल्या लिखाणातून औषध दिल्या जात असल्याचा प्रकार जनतेपुढे आणला होता. मात्र प्रशासकीय स्तरावरुन अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. गत काही वर्षांपूर्वी एका बोगस डॉक्टरने तालुक्यातील एका नागरिकाच्या पायावर शस्त्रक्रिया केली. मात्र पाय दुरूस्त होण्याऐवजी त्याला आजीवन अपंगत्व आले. असा प्रकार कित्येक रूग्णांसोबत घडत असून नागरिकांच्या जीवताशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)