महिला मंचतर्फे रक्तदान शिबिर

By Admin | Updated: March 31, 2016 01:27 IST2016-03-31T01:27:40+5:302016-03-31T01:27:40+5:30

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला मंचच्या वतीने शिक्षिकांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे करण्यात आले.

Blood Donation Camp by Women Forum | महिला मंचतर्फे रक्तदान शिबिर

महिला मंचतर्फे रक्तदान शिबिर

चंद्रपूर : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या महिला मंचच्या वतीने शिक्षिकांच्या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे करण्यात आले.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तपेढीत रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. तसेच शिक्षिकांमध्ये रक्तदानविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात शिक्षिकांचे हिमोग्लोबीन, ब्लडप्रेशर, शुगर आदी तपासणी शिबिरही घेण्यात आले.
शिबिरात एकूण ३० महिला व पाच पुरुषांनी रक्तदान केले. यावेळी कृतज्ञता व्यक्त करीत रक्तदान करून तसेच शिबिराच्या आयोजनात मदत करणाऱ्या पुरुष पदाधिकाऱ्यांचा महिला मंचच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
रक्तदान शिबिराचे आयोजन महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा अल्का ठाकरे, राज्य उपाध्यक्षा चंदा खांडरे, विद्या खटी, सुनीता इटनकर, अर्चना येरणे, वैशाली दीक्षित, प्रतिभा उदापूरे, रंजना रांगणकर, पौर्णिमा मेहरकुरे, सुलक्षणा गायकवाड, वंदना वाटेकर, पूनम सोरते, दीपाली खटी, ज्योती खरकाटे, रेणुका कन्नावार, माधुरी गड्डमवार, वंदना चिटकेसीवार, वंदना वनकर, भारती घागे, तृप्ती भुरघाटे, अरुणा मांडवकर, केशर चकोले, ज्योती कंकडालवार, समिता घाटे, यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भोगेकर, दीपक वऱ्हेकर, हरिश ससनकर, दीपक ठाकरे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Blood Donation Camp by Women Forum