शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न; कटकारस्थानांचा तीळमात्र फरक पडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 14:37 IST

वडेट्टीवार यांचा आरोप : सावली येथे कार्यकर्ता बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क सावली : ब्रह्मपुरी मतदार संघात भाजपकडून जातकारणाचे विष पेरण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्रात सर्वधर्मसमभाव सर्व समाज बांधवांना समान न्याय वागणूक देणारा लोकप्रतिनिधी, अशी माझी ओळख आहे. मला अशा कटकारस्थानांचा तीळमात्र ही फरक पडणार नाही असे आव्हान विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना दिले.

सावली तालुक्यातील हिरापूर येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते ते म्हणाले, माझा कार्यकर्ता माझ्या पक्षाची रक्तवाहिनी असून माझी काँग्रेसची फळी अतुट बांधल्या गेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत माझ्यावर राज्याच्या निवडणुकीची मोठी जबाबदारी असल्याने आपण खुद्द माझा बूथ माझी जबाबदारी व मीच उमेदवार या मूलमंत्राने जोमाने काम करा. असे आवाहन त्यांनी केले. 

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात समृद्धी शेतीसाठी गोसेखुर्द व घोडाझरी धरणाचे पाणी पोहोचविले. शुद्ध पेयजनासाठी गावोगावी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. रस्ते, सामाजिक सभागृहे, वाचनालये ग्रामपंचायत भवन, प्रशासकीय कार्यालयासाठी प्रशस्त इमारती, आरोग्य केंद्रांसाठी प्रशस्ती इमारती, रुग्णवाहिका, बस स्थानक, अशा अनेक सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी शासन स्तरावरून खेचून आणला याकडे लक्ष वेधले. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनीही उमार्गदर्शन केले. प्रास्ताविक काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन गोहणे, सूत्रसंचालन सचिन शेंडे यांनी केले. बैठकीला पांडुरंग पा. तांगडे, राजेश सिद्धम, प्रशांत गाडेवार उषा भोयर, राकेश गड्डमवार, अवधूत कोठेवार, विजय कोरेवार, विजय मुत्यालवार, लता लाकडे, मुन्ना स्वामी, किशोर कारडे, पुरुषोत्तम चुधरी, मनोहर ठाकरे, गोपाल रायपुरे, कृष्णा राऊत, यशवंत ताडाम, रोशन बोरकर, नितिन दुव्वावार, अमरदिप कोनपत्तीवार तसेच सावली तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, बूथ प्रमुख तथा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार