१२ आमदारांच्या निलंबनाविरूद्ध भाजप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:31+5:30

चंद्रपुरातील गांधी चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढील एक वर्ष हे आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही, ही बाब लोकशाहीची हत्या करणारी असल्याचा आरोप करून, महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजयुमोने केली.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांकडे पाठविले.

BJP on the streets against the suspension of 12 MLAs | १२ आमदारांच्या निलंबनाविरूद्ध भाजप रस्त्यावर

१२ आमदारांच्या निलंबनाविरूद्ध भाजप रस्त्यावर

ठळक मुद्देकार्यकर्त्यांची घोषणाबाजी : लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ओबीसी आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचा आग्रह धरल्याने  राज्य सरकारने खोटा आरोप लावून १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी जिल्हाभरात राज्य सरकारविरुद्ध आंदोलन केले. भाजपच्या आक्रमकतेला तोंड देण्याची हिंमत महाआघाडी सरकारमध्ये नाही.   आवाज दाबण्यासाठी १२ आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोपही यावेळी केला आहे.
चंद्रपुरातील गांधी चौकात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुढील एक वर्ष हे आमदार सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकणार नाही, ही बाब लोकशाहीची हत्या करणारी असल्याचा आरोप करून, महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजयुमोने केली.  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांकडे पाठविले. शिष्टमंडळात भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, माजी आमदार सुदर्शन निमकर, प्रकाश धारणे,  रवी लोणकर आदींचा समावेश होता.

मूलमध्ये एसडीओंना निवेदन
मूल :  माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांच्या नेतृत्वात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, चंदू मारगोनवर, प्रभाकर, प्रशांत समर्थ, नागराज गेडाम, प्रशांत लाडवे व कार्यकर्ते उपस्थित होते.  

कोरपना येथे राज्य सरकारचा निषेध
कोरपना : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूरचे शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, विशाल गज्जलवार, माजी सभापती संजय मुसळे, पंचायत समिती सदस्य नूतन कुमार जीवने, नगरसेवक अरविंद डोहे, अमोल आसेकर, शशिकांत आडकिने, अरुण मडावी, जिल्हा सचिव ओम पवार, दिनेश खडसे, हरी गोरे, संदीप शेरकी, अनिल कवरासे, कार्तिक गोडलावार, हरबाजी झाडे, अभय डोहे, पवन मोहितकार आदी उपस्थित होते.

 

Web Title: BJP on the streets against the suspension of 12 MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा