शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेसची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

भद्रावती तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. यापैकी ...

भद्रावती तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र आहे. यापैकी सहा ठिकाणी भाजपा, चार ठिकाणी काँग्रेस, दोन ठिकाणी शिवसेना पक्षाचे सरपंच निवडून आले आहे.

विशेष म्हणजे पेवरा तू. ग्रामपंचायत येथे पती-पत्नी सरपंच व उपसरपंचपदी निवडून आले. अनिता भोगेकार यांची सरपंचपदी तर कवडू भोगेकार हे उपसरपंचपदी निवडून आले.

शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या पिंपरी देशमुख ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी अर्चना नांदे तर उपसरपंचपदी पंकज खंडाळे निवडून आले. चिरादेवी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या निर्मला मेश्राम सरपंचपदी तर उपसरपंचपदी प्रदीप देवतळे निवडून आले. कडोली ग्रामपंचायतीवर काँग्रेसच्या शशिकला इंगोले सरपंचपदी तर शिवसेनेच्या माधुरी डुकरे उपसरपंचपदी निवडून आल्या. चोरा ग्रामपंचायत येथे भाजपच्या संगीता खिरडकर सरपंचपदी तर विलास जीवतोडे उपसरपंचपदी निवडून आले. डोंगरगाव खडी ग्रामपंचायतीवर भाजपचे मनिषा तुरांकर सरपंचपदी तर मुकेश आस्कर उपसरपंचपदी निवडून आले. कोंढेगाव ग्रामपंचायतीवर भाजपच्या शुभांगी चौखे सरपंचपदी तर उपसरपंचपदी रवींद्र घोडमारे निवडून आले. सेलोरी वाघेडा ग्रामपंचायतीवर भाजपच्या पौर्णिमा ढोक सरपंचपदी तर उपसरपंचपदी सुरेश तराळे निवडून आले .सागरा ग्रामपंचायतीवर नामनिर्देशन पत्र अपात्र असल्यामुळे सरपंच पद रिक्त राहिले तर उपसरपंचपदी शंकर रासेकर निवडून आले. चालबर्डी कोंडा ग्रामपंचायतीवर

भाजपाचे विजय खंगार सरपंचपदी तर उपसरपंचपदी कल्पना भुसारी निवडून आले . मनगाव ग्रामपंचायतीवर सुनील खामनकर सरपंचपदी तर विठ्ठल येरेकार उपसरपंचपदी निवडून आले. वायगाव तुकूम येथे काँग्रेसच्या भावना कुरेकर सरपंचपदी तर उपसरपंचपदी विनोद मडावी निवडून आले. पारोधी ग्रामपंचायतीवर काँग्रेसच्या कल्पना भोंगळे सरपंचपदी तर उपसरपंचपदी विकास गजबे निवडून आले. कोकेवाडा मानकर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे अनिल चौधरी सरपंचपदी तर उपसरपंचपदी प्रतिभा नन्नावरे निवडून आले.