शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

‘कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी...’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 09:48 IST

चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात; मराठीमध्ये केली भाषणाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : “माता महाकाली यांच्या पावनभूमीत शक्तीला नमन करून चंद्रपूरकरांना माझा नमस्कार,” अशा शब्दांत मराठीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्यापासून गुढीपाडवा नवे पर्व सुरू होत आहे. सगळ्या बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा मराठीत शुभेच्छा देतानाच भाषणाच्या ओघात  ‘कडू कारले, तुपात तळले, सारखेत घाेळले तरी कडू ते कडूच’ अशी म्हण वापरून काँग्रेसवाले कधी सुधारणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी प्रहार केला. 

काश्मीरमधील अशांततेबद्दल बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर सडकून टीका करायचे. ते देश जाेडणाऱ्या शक्तींसाेबत सदैव राहिले; पण, नकली शिवसेनेवाले काँग्रेसच्या मदतीने देश ताेडण्याची भाषा करणाऱ्या लोकांसोबत तसेच सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणणाऱ्यांसोबत मुंबईत रॅली करतात, अशी उद्धवसेनेवर सडकून टीका मोदींनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आम्ही वेगाने काम करतो आहोत. नियत चांगली असली की निकालही चांगलेच येतात, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातून....nगडचिराेली पोलाद कॅपिटल : आमच्या कार्यकाळात देशाला विकासाच्या मार्गावर नेले, गडचिराेलीतील नक्षलवाद कमजाेर केला, आता गडचिराेली ही देशाची पोलाद कॅपिटल म्हणून म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे देशात केवळ एकच गॅरंटी चालते ती म्हणजे माेदींची गॅरंटी.nमाेदींनी नाही, एका मताने बदलले भविष्य : भाजप एनडीए सरकारने माेठे निर्णय घेतले, विकास गतिमान केला. दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबांचे आयुष्य बदलण्यासाठी काम करून दाखवले. चार कोटी लोकांना घरे मिळवून दिली. हे काेणी केले, हे काेणी केले? माेदींनी नाही केले, हे फक्त तुमच्या एका मताने केले, त्या एका मतामुळे माेंदीना ताकद मिळाली, मी कुठल्याही शाही घराण्यातून आलेलो नाही. तुम्हीच मला इथवर आणले आहे.nचंद्रपूरचे सागवान राममंदिर व संसदेत : चंद्रपूरकरांचा स्नेह मला अधिक भावला आहे. चंद्रपूरच्या जंगलातील सागवान हे अयाेध्येच्या राम मंदिरात व नव्या भारताची ओळख असलेल्या संसदेत लागलेले आहे. त्यामुळे चंद्रपूरची ओळख देशभरात झाली आहे. 

माेदींच्या हातात संविधान मजबूत : आठवले

माेंदीच्या हातात संविधान मजबूत असून, गाेरगरीब जनतेचे भले करण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यामुळे संविधान धाेक्यात आहे, अशी अफवा पसरविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.यावेळी आठवले यांनी आपल्या खास आणि चिरपरिचित शैलीत काही रचना ऐकवल्या. त्या अशा...जे कधीच राहिले नाही कुणाचे मिंधे,या ठिकाणी आले आहेतएकनाथ शिंदे!महाराष्ट्रातील महायुती मजबुतीसाठीदेवेंद्र फडणवीस यांचा आहे वाटा,कारण त्यांनी काढला आहेशरद पवार, उद्धव ठाकरेंचा काटा! ..................ज्या वेळी मी चंद्रपुरात येताे माझ्या आठवणीत येते चंद्रयानसाऱ्या जगाचे असते भारताकडे ध्यान,या देशाची १४० काेटी जनता आहेनरेंद्र माेदीजींची फॅनया निवडणुकीत आम्ही लावणार आहेइंडिया आघाडीवर बॅन!..................आम्ही करणार आहाेत चारशे पार,मग का हाेणार नाही काँग्रेसची हार?

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर