शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर येथे बिरसा मुंडा जयंती समारोह

By admin | Updated: November 18, 2015 01:15 IST

तालुक्यातील विसापूर येथील आदिवासी संस्कृती संवर्धन महिला समितीच्या वतीने स्थानिक पेरसापेन देवस्थान सम्राट चौक येथे क्रांतिसूर्य व आदिवासीचे जननायक ...

ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार : गोंडी नृत्याची मेजवानीबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील आदिवासी संस्कृती संवर्धन महिला समितीच्या वतीने स्थानिक पेरसापेन देवस्थान सम्राट चौक येथे क्रांतिसूर्य व आदिवासीचे जननायक भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह रविवारी आयोजित करण्यात आला. यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान, बिरसा मुंडा प्रतिमेची मिरवणूक, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार, प्रबोधनात्मक कार्यक्रम, गोंडी नृत्याची मेजवाणी आदी कार्यक्रमाची रेलचेल होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक एकनाथ कन्नाके होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी जनसंपर्क समितीचे अध्यक्ष मनोहर मसराम, सचिव भोला मडावी, बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम, कविता मडावी, विसापूरच्या सरपंच रिता जिलठे, उपसरपंच सुनील टोंगे, नामदेव शेडमाके व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना कविता मडावी म्हणाल्या, आदिवासी समाजाने शिक्षणाची कास धरुन वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. समाजाचा विकास साधण्याचे तेच प्रभावी माध्यम आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भगवान बिरसा मुंडाचे ध्येय समोर ठेवा. त्यांचा आदर्श जोपासा, असे त्यांनी सांगितले. अनकेश्वर मेश्राम, भोला मडावी, हरीश गेडाम यांनी बिरसामुंडाचा जीवनकार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.दरम्यान, समितीच्या वतीने विसारपूरच्या सरपंच रिता जिलठे, उपसरपंच सुनील टोंगे, ग्रामपंचायत सदस्य सचिन टोंगे, अनंता कन्नाके, बुद्धिमान कांबळे, अशोक थेरे, शारदा डाहुले, सुरेखा इटनकर, शशीकला जीवने, मीना जुमनाके, उज्ज्वला कोडापे, सुरेखा कोडापे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित गोंडी डेमसा नृत्य स्पर्धेने प्रेक्षकांना रिझविले. संचालन प्रवीण सलाम यांनी तर आभार हरीश गेडाम यांनी मानले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)