भद्रावतीत उपजिल्हा रुग्णालयाचे संकेत

By Admin | Updated: May 31, 2015 01:58 IST2015-05-31T01:58:03+5:302015-05-31T01:58:03+5:30

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते.

Bhadravati Sub-District Hospital signs | भद्रावतीत उपजिल्हा रुग्णालयाचे संकेत

भद्रावतीत उपजिल्हा रुग्णालयाचे संकेत

भद्रावती : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आरोग्य सेवा गावागावात पोहचविण्यात येते. परंतु भद्रावती येथील कार्यरत ग्रामीण रुग्णालय रिक्त पदे, अपुरा औषधीसाठा, आवश्यक आरोग्य विषयक तपासणी मशीन यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, अतीआजारी रुग्णांकरिता वेळेवर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था न होणे आदी समस्येने ग्रासलेले आहे. त्यामुळे भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी केली आहे.
भद्रावती तालुक्यातील लोकसंख्या १,६३,८०५ असून तालुक्यात वेगाने औद्योगीकरण होत आहे. कोळसा खाण प्रकल्प, विद्युत प्रकल्प कार्यरत आहे. परंतु पर्याप्त आरोग्य सेवा देण्यास ग्रामीण रुग्णालय असमर्थ ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरातील जनतेला क्षुल्लक आजाराकरिता चंद्रपूर येथे रेफर केले जाते. या बाबीचा विचार करून वरोरा धानोरकर यांनी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करण्यात येऊन येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना ३ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून निवेदन सादर केले. या अनुषंगाने अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र ८ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक चंद्रपूर यांच्यामार्फत उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ नागपूर यांना विस्तृत अहवाल सादर केला आहे. भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धण करून विशेष बाब म्हणून उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
धानोरकर हे भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याकरिता आवश्यक निधी व अन्य बाबी शासनाकडून मंजूर करून घेण्याकरिता प्रत्यशील आहेत. चालू आर्थिक वर्षात भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात येईल, असे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhadravati Sub-District Hospital signs