इनरव्हील क्लबतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST2021-09-23T04:31:35+5:302021-09-23T04:31:35+5:30
चंद्रपूर : घरातील एक स्त्री सुशिक्षित असेल तर संपूर्ण घरालाच पुढे नेते. त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपूर्ण असणे ही काळाची गरज ...

इनरव्हील क्लबतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षण
चंद्रपूर : घरातील एक स्त्री सुशिक्षित असेल तर संपूर्ण घरालाच पुढे नेते. त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपूर्ण असणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या वतीने गरजू महिलांसाठी ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात दहा मुलींनी सहभाग घेतला.
इनरव्हील क्लबतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. महिला स्वयंरोजगार करावयास लागल्यास आर्थिकदृट्या सक्षम होतील. त्यातून त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लागेल. तसेच त्याचा आत्मविश्वास वाढेल व त्या स्वावलंबी होतील या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यामध्ये दहा मुलींनी सहभाग घेतला. श्रुती कुकडे त्यांच्या पार्लरमध्ये तीन महिने दहा मुलींना प्रशिक्षण देणार आहेत. त्याबद्दल क्लबच्या अध्यक्ष डॉ शीतल बुक्कावार यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी अंजली बिरेवार, श्रुती कुकडे, अश्विनी रघुशे आदी उपस्थित होते.