शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

बांद्रा जि.प. शाळा भाड्याच्या खोलीत

By admin | Updated: February 8, 2015 23:32 IST

कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातंर्गत शासनाच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्याचा कांगावा होत असताना वरोरा तालुक्यातील

वरोरा : कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातंर्गत शासनाच्या वतीने सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्याचा कांगावा होत असताना वरोरा तालुक्यातील बांद्रा जि. प. शाळा भाड्याच्या खोलीत सुरु आहे. शाळेला इमारत आहे, मात्र दोनच वर्ग खोल्या असून त्याही जीर्ण आहेत. त्यामुळे शाळेतील तीन वर्ग मागील काही दिवसांपासून भाड्याच्या घरात भरविले जात आहे.वरोरा तालुक्यातील जि.प. बांद्रा शाळेत इयत्ता १ ते ५ वी पर्यंतचे वर्ग असून ६४ मुले मुली शिक्षण घेत आहेत. कवेलू व स्लॅब असलेल्या दोन इमारती शाळेला होत्या. कवेलूची इमारत जीर्ण झाल्याने पाडण्यात आली आहे तर बावीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या स्लॅबच्या इमारतीत एक हॉल व एक वऱ्हांडा आहे. यामध्ये इयत्ता १ ते ५ मधील ६४ विद्यार्थ्यांना तीन शिक्षक शिकवीत आहे. सध्या जी इमारत आहे, त्याच्या स्लॅबला भगदाडे पडले असून इमारत जीर्ण अवस्थेत आहे.याच इमारतीत विद्यार्थी विद्यार्जनाचे कार्य व शाळेचे कार्यालय थाटण्यात आले आहे. या इमारती मधील हॉलमध्ये शाळेचा रेकार्ड व साहित्य अर्ध्या जागेत प्लॅस्टीकमध्ये गुंडाळून ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्याकरिता बसण्याकरिता जागा नाही. परिणामी इयत्ता चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना बसण्याकरिता शाळेसमोरील एका व्यक्तीच्या भाड्याच्या खोलीत डेस्क बेंच लावून व्यवस्था करण्यात आली आहे. खाजगी व्यक्तीच्या घरात मागील काही दिवसापासून जि.प. शाळेचे वर्ग चालवीले जात असून सदर घराचा भाड्याच्या प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु, हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे किराया सदर व्यक्तीस मिळाला नाही तर येत्या काही दिवसांत किरायाच्या घरातही शाळा चालविणे बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)