शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बल्‍लारपूर क्रीडा संकुल ऑलम्पिक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:23 IST

सुनील केदार : सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार मुंबईत बैठक चंद्रपूर : २०२४ मध्‍ये होणाऱ्या ऑलम्‍पिक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त खेळाडू तयार ...

सुनील केदार : सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीनुसार मुंबईत बैठक

चंद्रपूर : २०२४ मध्‍ये होणाऱ्या ऑलम्‍पिक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त खेळाडू तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने तज्‍ज्ञांकरवी प्रशिक्षण व अन्‍य बाबींसाठी चंद्रपूर जिल्‍ह्यातील बल्‍लारपूर तालुका क्रीडा संकुल रिलायन्‍स फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे, यासाठी राज्‍य सरकार रिलायन्‍स फाऊंडेशनला विनंती करेल. तसेच बल्‍लारपूर तालुका क्रीडा संकुलाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्‍हणून मान्‍यता मिळावी, यासाठी केंद्रीय क्रीडा राज्‍यमंत्री किरण रिजीजू यांनासुध्‍दा आपण विनंती करणार असल्‍याचे आश्‍वासन राज्‍याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिले.

मिशन शक्‍ती अंतर्गत बल्‍लारपूर येथील तालुका क्रीडा संकुल येथे २०२४ च्‍या ऑलम्‍पिक स्‍पर्धेच्‍या तयारीसाठी सेंटर फॉर एक्‍सलन्‍स सुरू करण्‍यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनसोबत करार करण्‍याच्‍या विषयासंदर्भात माजी अर्थमंत्रीआ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मंत्रालयात ना. केदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बुधवारी बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित जिल्‍ह्यातील खेळाडू २०२४ मध्‍ये होणाऱ्या ऑलम्‍पिक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने मिशन शक्‍ती या उपक्रमांतर्गत अत्‍याधुनिक क्रीडा विषयक सुविधांनी परिपूर्ण असे बल्‍लारपूर तालुका क्रीडा संकुल बांधण्‍यात आले. या तालुका क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्‍ती तसेच खेळाडू प्रशिक्षणासाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे, अशी विनंती रिलायन्‍स फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा निता अंबानी यांच्‍याकडे आपण केली असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

या तालुका क्रीडा संकुलाच्‍या वसतिगृहाची संरक्षक भिंत, सोलार सिस्‍टीम यासाठी त्‍वरित अंदाजपत्रक सादर करावे, आपण यासाठी प्राधान्‍याने निधी उपलब्‍ध करून देऊ, असे ना. केदार यांनी यावेळी सांगितले.