शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST

पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.

ठळक मुद्देहजारो भाविकांची उपस्थिती : गोविंदाच्या गजराने दुमदुमली नगरी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ३९३ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथयात्रेला ३० जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजाचे दर्शन घेत या रात घोडयाच्या मिरवणुकीने पंचक्रोशीतील बालाजी भक्त भाराऊन गेले.पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.शुक्रवारी रात घोडयाच्या मिरवणुकीत माजी आमदार मितेश भांगडिया, आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, वसंत वारजूकर, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, ठाणेदार स्वप्नील धुळे, बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मंगेश भलमे, डॉ. दीपक यावले, निलम राचलवार, सुरेश डाहुले, चंद्रकांत भोपे उपस्थित होते.मिरवणुकीअगोदर विधिवत पूजा करून मिरवणुकीला रात्री १२ वाजतानंतर भक्तीमय वातावरणात मोठया ढोलताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने सुरूवात करण्यात आली. रात घोडयाची मिरवणूक बालाजी मंदिर, ते नेहरू चौक, अंहिसा चौक, बाजार ओळ, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक अशी फिरत सकाळी ५.३० वाजता बालाजी मंदिरात विराजमान झाली.या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील हजारो बालाजी भक्त मोठया उसाहात सहभागी झाले होते. भक्ती-संगिताच्या तालावर व आतिषबाजीने बालाजी भक्ताचे डोळ्याचे पारणे फिटले तर गोविंदा - गोविदाच्या गजराने चिमूर क्रांती नगरी दुमदुमून गेली होती. या यात्रेमुळे चिमुरात भक्तीचे वातावरण आहे.महाशिवरात्रीपर्यंत चालणार यात्रामहाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या घोडा रथ यात्रेमध्ये यावर्षीचे विशेष आकर्षण बालाजी मंदिराच्या आवारातील अयोध्या येथील प्रसिद्ध श्री राम मंदिराची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूर नगरीत मनोरजंनाच्या साधनासह, मौत का कुआ, आकाश पाळणे, असे अनेक प्रकारच्या दुकानासह मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तस्थानिक नगर परिषद प्रशासन व श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटी यांनी भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. तर यात्रेदरम्यान शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.